आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका होरपळली:अ‍ॅरिझोनासह पाच राज्यांतील वनक्षेत्रात पेटलेला वणवा नियंत्रणाबाहेर ; 6 कोटी लोकांना उष्णतेच्या झळा

अमेरिका11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील नागरिक दुष्काळ व जंगलातील वणव्याने हैराण झाले आहेत. भीषण उष्णतेच्या झळा त्यांना अस्वस्थ करणाऱ्या ठरल्या आहेत. गुरुवारी राष्ट्रीय हवामान विभागाने याबाबत इशाराही दिला. देशातील पश्चिम-मध्य व दक्षिण-मध्य भागात कडक उन्हाळा जाणवू लागेल. उष्णतेपासून सुटका हाेण्यासाठी किमान आठवडा लागू शकताे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यात दक्षिण कॅलिफाेर्निया, पश्चिम व्हर्जिनिया, फ्लोरिडा यांचा समावेश आहे. या भागात उष्णतेचा फटका सुमारे ६ कोटी लोकांना बसू शकताे. वास्तविक एक दिवस आधी अमेरिकेतील अनेक राज्यांत तापमान ३३ अंशांहून ३८ अंशांपर्यंत पाेहाेचले हाेते. १९६० च्या दशकात वार्षिक दाेन दिवस उष्णतेची लाट जाणवत असे. परंतु २०१० पर्यंत उष्णतेच्या लाटेचा हा कालावधी सहा दिवसांपर्यंत वाढला. आता तर कहर झाला आहे. १९६० च्या तुलनेत आता उष्णतेची लाट ४५ दिवसांपर्यंत लांबल्याचे दिसून येते. उत्तर पश्चिम प्रशांत व उत्तरेतील मैदानी भाग वगळता, आॅगस्टच्या मध्यापर्यंत अमेरिकेत सरासरीहून जास्त उष्णता राहण्याची शक्यता आहे.

५ राज्यांत आगीमुळे १० लाख एकर जंगल नष्ट
*सेंट्रल ग्रेट बेसिन व दक्षिण-पश्चिमेकडील काही भागात शनिवारपर्यंत वणवा आणखी वाढण्याची भीती आहे. कॅनसासमध्ये उष्णता व उकाड्याने २ हजार पशुपालकांचा मृत्यू झाला.
*आग, दुष्काळ व पुरामुळे अमेरिकेसमाेर समस्या निर्माण झाली आहे. कॅलिफाेर्निया वणव्याने हैराण आहे. तेथे एका दिवसात १०० एकर जंगल खाक झाले. ५ राज्यांत आगीमुळे १० लाख एकर जंगल नष्ट झाले.
*दुष्काळामुळे कोलोराडाे नदी घाटाच्या माेठ्या भागावर दुष्काळ आहे. त्यामुळेदेखील उष्णतेत वाढ हाेत आहे. येलोस्टाेन पार्कला अलीकडेच पुराचा तडाखा बसला.

बातम्या आणखी आहेत...