आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाचा महिमा:अफगाणिस्तानचे माजी अर्थमंत्री खालिद पाएंदा आता अमेरिकेत टॅक्सी चालक, पूर्वी लाखो डॉलर्स सांभाळले, आता उदरर्निवाह करणेही अवघड

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खालिद म्हणजे 'स्थायी'. पण, अफगाणिस्तानचे माजी अर्थमंत्री खालिद पाएंदा यांच्या जीवनात काहीच कायमस्वरुपी नाही. गत 6 ऑगस्टपर्यंत हा व्यक्ती देशाची 6 अब्ज डॉलर्सची तिजोरी सांभाळत होता. पण, आता तो अमेरिकेत पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क कॅब ड्रायव्हर झाला आहे. देशावर तालिबानचे राज्य आले. अमेरिकेचे सैन्य अफगाणबाहेर पडले. राष्ट्राध्यक्ष अशरफ गणी व त्यांचे मंत्री जनतेला वाऱ्यावर सोडून परदेशात पळून गेले. खालिदही त्यांच्यातील एक आहेत. पण, त्यांची स्थिती गणींसारखी नाही. ते अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीत टॅक्सी चालवून आपला उदरर्निवाह करत आहेत.

बोनससाठी संघर्ष

वॉशिंग्टन पोस्टशी वार्तालाप करताना खालिद म्हणाले -पुढील 2 दिवसांत मला 50 फेऱ्या पूर्ण करावयाच्या आहेत. यासाठी मला 95 डॉलर्सचे बोन मिळेल. घरात पत्नी व 4 मुले आहेत. काही बचत होती. त्यातूनही काम चालत आहे. माझ्या अफगाणिस्तानची स्थिती अत्यंत वाईट आहे. महामारी तर होतीच. पण, आता दुष्काळही पडला आहे. जगाने अनेक निर्बंध लादलेत. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. तालिबानने महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानवरील तालिबानच्या ताब्याचे खापर तेथील सरकारवर फोडले होते. आम्ही अफगाण सरकार हवे ते सर्व उपलब्ध करवून दिले. पण, त्यांना आपले भविष्य चांगले करण्यात अपयश आले, असे ते म्हणाले.

खालिद कधिकाळी आंतरराष्ट्रीय कार्यालयांत पाहुण म्हणून जात होते. तिथे आता ते प्रवाशांना सोडत आहेत.
खालिद कधिकाळी आंतरराष्ट्रीय कार्यालयांत पाहुण म्हणून जात होते. तिथे आता ते प्रवाशांना सोडत आहेत.

काहीच उरले नाही
खालिद म्हणाले, माझ्या आयुष्याचा एक मोठा काळ अफगाणिस्तानात गेला. आता मी अमेरिकेत राहतो. खरे सांगायचे तर माझ्याकडे आता काहीच उरले नाही. मी मायदेशी परतू शकत नाही. येथे कोणता ठिकाणाही नाही. आज मला 4 डॉलरची टिप मिळाली.

खालिद यांनी तालिबानची राजवट येण्यापूर्वी काही दिवस अगोदर आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या मते, लेबनानच्या एका कंपनीचे पेमेंट झाले नव्हते. यामुळे राष्ट्राध्यक्ष गणी माझ्यावर नाराज होते. त्यांनी मला बरेच खरेखोटे सुनावले.

वॉशिंग्टन डीसीत खालिद आपली पत्नी व 4 मुलांसह एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये राहतात.
वॉशिंग्टन डीसीत खालिद आपली पत्नी व 4 मुलांसह एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये राहतात.

​​15 ऑगस्टपूर्वीच देश सोडला

पाएंदा यांचे कुटूंब ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच अफगाणहून अमेरिकेते पोहोचले होते,. ते 15 पूर्वी वॉशिंग्टनला पोहोचले होते. खालिद सांगतात, जगाने आम्हाला 20 वर्षे दिली. हर प्रकारे मदतही केली. पण, दुर्दैवाने आम्हाला अपयश आले. भ्रष्टाचारामुळे आमची व्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. आम्हीच आमच्या जनतेची फसवणूक केली हीच वस्तुस्थिती आहे. तालिबान पुन्हा देशावर ताबा मिळवेल हे मंत्र्यांना ठाऊक होते. ते व्हॉट्सअॅपद्वारे देश सोडण्याचे मॅसेज पाठवत होते.

खालिद यांच्या मते, ते अफगाणिस्तानला परत जाऊ शकत नाहीत. तसेच अमेरिकेत कुठपर्यंत राहता येईल हे ही त्यांना माहिती नाही.
खालिद यांच्या मते, ते अफगाणिस्तानला परत जाऊ शकत नाहीत. तसेच अमेरिकेत कुठपर्यंत राहता येईल हे ही त्यांना माहिती नाही.

वेदना कुरवाळणे योग्य नाही
अखेरिस अफगाणमध्ये काय घडले होते? या प्रश्नाचे उत्तर देताना खालिद म्हणाले, हे वेदना कुरळवात बसल्यासारखे होईल. खास गोष्ट म्हणजे सध्या मोहम्मद ओमर तालिबानचे अर्थमंत्री असून, ते खालिद यांचे बालमित्र आहेत.

खालिद यांनी पाकमध्येही काळ वास्तव्य केले. त्यांनी अफगाणमध्ये खासगी विद्यापीठही स्थापन केले होते. त्यांच्या मते, अमेरिकेने अफगाणमध्ये लोकशाही, महिला अधिकार व मानवाधिकारांसाठी प्रदिर्घ लढा दिला. 2008 मध्ये ते पहिल्यांदा अमेरिकेते आले होते. अमेरिकेच्या सूचनेनुसारच गणी यांनी 2016 मध्ये त्यांना उप अर्थमंत्री केले होते. काबूलमध्ये कोरोनामुळे त्यांच्या आईचा मृत्यू झाला. तालिबानचा अफगाणवरील फास वाढत असल्यामुळे त्यांचे मित्र व पत्नीने त्यांना मंत्रीपद घेण्यास विरोध केला होता.

बातम्या आणखी आहेत...