आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफेसबुकचे माजी प्रतिनिधी ब्रॅडन सिल्व्हरमॅन सध्या अमेरिकी काँग्रेससोबत जगातील सर्वात पारदर्शी कायदा तयार करण्यात व्यग्र आहेत. यामुळे सोशल मीडियाची अनेक रहस्ये उलगडतील. याला आजवर सोशल मीडियाचा ब्लॅक बॉक्स म्हटले जात होते. सिल्व्हरमॅन क्राऊडटेंगल नावाचे स्टार्टअप चालवत होते. हे खूपच लोकप्रिय स्टार्टअप होते. याद्वारे फेसबुकवर चालणारे कंटेंट ट्रॅक केले जात होते. म्हणजे कोणते कंटेंट लोकांचे लक्ष वेधत आहे, कोणत्या कंटेंटची व्ह्यूअरशिप किती आहे. फेसबुकने ते २०१६ मध्ये अधिग्रहित केले. त्यासोबतच सिल्व्हरमॅनही फेसबुकसोबत जोडले गेले. त्यांना कार्यकारी प्रतिनिधी बनवले गेले.
सिल्व्हरमॅन फेसबुकच्या अनेक प्रकल्पांत सहभागी होते. परंतु त्यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये फेसबुकचा राजीनामा दिला. त्यांनी अमेरिकी काँग्रेससोबत काम सुरू केले असून काँग्रेस सोशल मीडिया कंपन्यांच्या पारदर्शी स्वरूपासाठी कायदा बनवत आहे. सिल्व्हरमॅन यांच्या मते फेसबुकमध्ये काम करत असताना त्यांना लक्षात आले की, पारदर्शकतेला तेथे कोणतेच स्थान नव्हते. फेसबुकने इन्स्टाग्रामच्या मुलांसाठीचे अॅप बनवताना पारदर्शकतेकडे लक्षच दिले नाही. सिल्व्हरमॅन काँग्रेससोबत बनवत असलेल्या कायद्याबाबत सध्याच काहीही बोलायला तयार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.