आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद यांना बुधवारी रात्री साडेबारा वाजता अटक करण्यात आली. या कारवाईचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याचा माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यावरील आरोपाशी त्याचा संबंध जोडला जात आहे. त्यांच्याविरुद्ध इस्लामाबादमध्ये यापूर्वीच एफआयआर दाखल करण्यात आला होता.
अटकेनंतर रशीद यांनी सांगितले- पोलिसांनी मला कोणत्याही वॉरंटशिवाय अटक केली. पोलिसांनी माझ्या घराच्या खिडक्या आणि दरवाजे तोडले. हे असभ्य वर्तन आहे. त्यांनी माझ्या नोकरांना मारहाण केली आणि मला जबरदस्तीने गाडीत बसवले. एवढेच नाही तर आपल्या अटकेमागे शाहबाज शरीफ यांच्या सरकारचा हात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आता संपूर्ण प्रकरण जाणून घ्या...
1. 27 जानेवारीला रशीद यांनी झरदारींवर केले आरोप
27 जानेवारी 2023 रोजी शेख रशीद यांनी माजी राष्ट्राध्यक्ष झरदारी यांच्यावर इम्रानच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. इम्रान खानच्या हत्येचा कट रचण्यासाठी झरदारी एका दहशतवादी संघटनेला पैसे देत होते, असे रशीद म्हणाले. यानंतर इम्रान खाननेही तेच सांगितले. ते म्हणाले की, झरदारींकडे काळा पैसा आहे, जो ते दहशतवादी संघटनांना देतात.
2. रशीद यांनी आपल्या वक्तव्यावर घेतली माघार
त्यानंतर 30 जानेवारीला पोलिसांनी रशीद यांना समन्स पाठवले. त्यानंतर रशीद यांनी माजी राष्ट्रपतींवर लावण्यात आलेल्या आरोपांवरून माघार घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर रशीद यांनी असे म्हटले आहे. प्रत्यक्षात कोणते षडयंत्र रचले जात आहे की नाही हे त्यांना माहीत नव्हते.
3. इम्रान योग्य असल्याचे सांगितले
1 फेब्रुवारी रोजी राशिद यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, मी इम्रानसोबत आहे. ते म्हणाले होते - मी माझ्या विधानावर ठाम आहे. इम्रान खान बरोबर आहेत. आसिफ झरदारी त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. इम्रान खान यांच्या जीवाला गंभीर धोका आहे. त्यांची (झरदारींची) योजना इम्रान खान यांना अपात्र ठरवून कमकुवत करण्याची आहे. या प्रकरणी मी माझ्या वकिलासोबत पोलिस ठाण्यात जबाब देण्यासाठी गेलो होतो, तो पोलिसांनी नोदंवून घेतला नाही.
रशीद म्हणाले - माझा गुन्हा हा आहे की, मी खानसोबत आहे
पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) रावळपिंडी विभागाचे अध्यक्ष राजा इनायत उर रहमान यांनी रशीदविरुद्ध इस्लामाबादच्या अबपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. रशीद यांना बुधवारी रात्री उशिरा रावळपिंडी पोलिसांनी अटक केली. यानंतर त्यांना इस्लामाबादमधील अबपारा पोलीस ठाण्यात हलवण्यात आले आहे. यादरम्यान मीडियाशी संवाद साधताना ते म्हणाले- माझा गुन्हा हा आहे की, मी इम्रान खानसोबत उभा आहे. मी 16 वेळा मंत्री राहिलो आहे. आजपर्यंत माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही.
तथापि, शेख रशीद विरुद्ध अवैध धंद्याचा गुन्हा देखील नोंदविला गेला आहे. ज्यामध्ये इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाने 30 जानेवारी 2023 रोजी लाल हवेली तसेच त्यांच्या घरासह आणखी 5 युनिट्स सील केले. मात्र, त्याच दिवशी लाहोर उच्च न्यायालयाने त्यांची मालमत्ता सीलमुक्त करण्याचे आदेश दिले होते.
अटकेसाठी 200 हून अधिक पोलीस
पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजनुसार, पोलिसांनी शेख रशीद यांना रावळपिंडीतील मरे एक्सप्रेसवेवरून अटक केल्याचे सांगितले. मात्र रशीद यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी रशीद यांना त्यांच्या घरातून अटक केली. त्यांचा पुतण्या शेख रशीद शफीक यांच्यानुसार, जवळपास 300 ते 400 पोलीस घरात आले.
इम्रान यांनी अटकेचा निषेध केला
दरम्यान, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या अटकेचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले - रशीदच्या अटकेचा तीव्र निषेध. इतिहासात कधीही अशी पक्षपाती कारवाई झालेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.