आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Former President Donald Trump Was Adept At Misdirecting Investigations, Thus Avoiding Jail Time Several Times

विशेष:तपासाला भलतीच दिशा देण्यात माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प तरबेज, म्हणून अनेक वेळा ते तुरुंगवारीपासून बचावले

वॉशिंग्टन9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोप फेटाळतात, सर्व आदेश तोंडी, कोणतीही गोष्ट लेखी स्वरूपात देत नाहीत

दोन-दोन महाभियोग, कर चोरीचे आरोप, कोर्ट कज्जे, तपास-चौकश्या आणि छापेमारीच्या कारवाया जेवढ्या डोनाल्ड ट्रम्पविरोधात झाल्या तितक्या अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षांविरोधात झालेल्या नाहीत. एवढे ‘उद्योग’ करूनही ट्रम्प खंबीर आहेत. बुधवारी ट्रम्प आणि त्यांची मुले, ट्रम्प संघटना,कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक आदींविरोधात राज्य सरकारतर्फे फसवणुकीचा खटला गुदरण्याची घोषणा न्यूयॉर्कच्या अॅटर्नी जनरल लेटिटिया जेम्स यांनी केली आहे. कायद्याच्या कचाट्यातून सुटका करुन घेण्यासाठी आरोप फेटाळणे, तपासला भलतीच दिशा देणे, चौकशी लांबवणे आणि कोणतीही गोष्ट लिखित स्वरुपात न देणे असे ट्रम्प यांचे डावपेच असतात. वास्तविक, ट्रम्प यांचे कायद्याचे डावपेच कसे खेळावे याचे धडे गिरवणे ४९ वर्षांपूर्वीच सुरु झाले होते. त्यावेळी ट्रम्प यांचे वय केवळ २९ होते. सन १९७३ मध्ये न्याय विभागाने ट्रम्प आणि त्यांचे पिता फ्रेड ट्रम्प यांच्याविरोधात नागरी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल खटला गुदरला होता.

पिता-पुत्र आणि त्यांची कंपनीने क्विन्स, ब्रुकलीन आणि स्टेटन आयलँड येथील १४ हजार अपार्टमेंटमध्ये कृष्णवर्णीय नागरिकांना घरे दिली नाहीत हे फेअर हाऊसिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. अपार्टमेंट रिकामे असूनही त्यांना जागा नसल्याचे सांगण्यात आले होते. ट्रम्प कुटुंबाने हा खटला लढवण्यासाठी सिनेटर मॅकार्थी यांचे वकील रॉय कॉन यांची नियुक्ती केली. कॉन यांनी उलट न्याय विभागावरच ८०० कोटीं रुपये अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. दोन वर्षांनंतर या खटल्यात तडजोड अशी झाली की, रिकामी फ्लॅट्सची यादी आम्ही न्यूयॉर्क अर्बन लीगकडे सोपवू. ट्रम्प कुटंुबीयांनी हा आपलाच विजय झाल्याचा डंका जगभर वाजवला. वेस्टर्न न्यू इंग्लंड विद्यापीठातील कायदा विभागाच्या प्रो.जेनिफर टॉब या ट्रम्प यांच्या याच डावपेचांचा अभ्यास करीत आहेत. यामुळेच ट्रम्प आतापर्यत तुरुंगवारीपासून बचावले आहेत. तरुणपणी कॉन यांच्याकडून शिकलेले कायद्याचे डावपेच यशस्वीपणे वापरले. ट्रम्प आपल्या कारस्थांनांची कबुली देण्याऐवजी आक्रमक रुप घेऊन बाजी उलटवतात, असे टाॅब यांनी सांगितले.

ट्रम्प यांच्याविरुद्ध विविध चौकशा-तपास सुरू आहेत २०२० राष्ट्राध्यक्ष निवडणुक जिंकण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणणे कॅपिटल इमारत हल्ला प्रकरणी ट्रम्प यांच्या संशयास्पद भूमिकेची चौकशी सुरु आहे शासकीय गोपनीय दस्तऐवज ट्रम्प घरी घेऊन गेले अनेकवेळा मागूनही परत केले नाही. कर चोरी व व्यापारात फसवणुक प्रकरणी ऑक्टोबरपासून सुरु होणार खटला

बातम्या आणखी आहेत...