आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे मायदेशी परतले:चोख सुरक्षेत विमानतळाबाहेर काढले, जनविरोधामुळे सोडला होता देश

कोलंबोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे शुक्रवारी रात्री उशिरा सिंगापूर एअरलाइन्सने मायदेशी परतले. 73 वर्षीय राजपक्षे जवळपास 7 आठवड्यांनंतर बँकॉकहून सिंगापूरमार्गे लंकेला परतले. कोलंबोच्या बंदरानायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे अनेक मंत्र्यांनी स्वागत केले. त्यांना मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत विमानतळाबाहेर काढण्यात आले.

श्रीलंकेतील निर्माण झालेल्या ऐतिहासिक आर्थिक संकटामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात देशव्यापी आंदोलन सुरू झाले होते. 9 जुलै रोजी सर्वसामान्य जनतेने राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ताबा मिळवला होता. त्यानंतर राजपक्षेंनी देशातून पळ काढला होता. 13 जुलै रोजी ते कुटुंबासह मालदीवमध्ये दिसले. त्यानंतर सिंगापूरला पोहोचले. याच दिवशी श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी लागू करण्यात आली होती.

श्रीलंकेच्या राजकारणातील 2 सर्वात ताकदवान चेहरे गोटबाया राजपक्षे व महिंदा राजपक्षे. गोटबाया माजी राष्ट्रपती आहेत. त्यांना जनतेच्या विरोधामुळे देशातून पळ काढावा लागला होता. तर महिंदा यांना विरोधामुळे मे महिन्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गोटबाया 2019 मध्ये श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाले होते. तर महिंदा 2004 मध्ये पंतप्रधान व त्यानंतर 2005 ते 2015 पर्यंत राष्ट्रपती राहिले होते.

राजपक्षेंची सुरक्षा वाढवण्याची मागणी

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी राजपक्षेंच्या मायदेशी परतण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी राजपक्षेंच्या एसएलपीपी पक्षाने विक्रमसिंघेंना विनंती केली होती. यासाठी गत 19 तारखेला एसएलपीपीचे सरचिटणीस सागर करियावासम यांनी विक्रमसिंघेंची भेट घेतली होती. त्यांच्या विनंतीनुसार, श्रीलंकन सरकारने राजपक्षेंच्या सुरक्षेची चोख व्यवस्था केली आहे.

13 जुलैला सोडला होता देश

देशात सरकारविरोधात असंतोष उफाळून आल्यामुळे राजपक्षेंनी कुटुंबासह 13 जुलै रोजी पलायन केले होते. त्यानंतर ते सिंगापूरला पोहोचले. तेथूनच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा ई-मेलने पाठवले. सिंगापूरने त्यांना दोनवेळाी 28 दिवस देशात राहण्याची परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी ही मुदत वाढवण्यास नकार दिला.

श्रीलंकेच्या अनेक संघटनांनी सिंगापूरला राजपक्षेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पण त्यावर कारवाई होण्यापूर्वीच त्यांनी तो देश सोडला. माहितीनुसार, ते सिंगापूरहून एका नियमित फ्लाइटने थायलंडला रवाना झाले होते.

थायलंड सरकारने दिला होता सशर्त व्हिजिटिंग व्हिसा

राजपक्षेंना सिंगापूरमध्ये स्थायी व्हिसा हवा होता. पण तेथील सरकारने त्यांची मागणी मान्य केली नाही. त्यानंतर त्यांनी थायलंडहून मायदेशी परतण्याची परवानगी मागितली. थायलंड सरकारने मानवीय आधारावर 73 वर्षीय गोटबायांना व्हिजिटिंग व्हिसा दिला होता. पण तो सशर्त होता. त्यांना थायलंडमध्ये राहून इतर देशांत राजाश्रय मागावा लागणार होता. पण श्रीलंकेच्या अंतर्गत राजकारण ढवळाढवळ करण्याची त्यांना परवानगी नव्हती.

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या नागरिकांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला होता. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती गोटबाया राजपक्षेंना देश सोडून पळून जावे लागले होते. ते प्रथम मालदिवला पळाले. त्यानंतर सिंगापूरला पोहोचले. तेथूनच त्यांनी राजीनामा दिला.

बातम्या आणखी आहेत...