आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण कोरियाचे माजी लष्करशहा चून डू ह्वान यांचे नातू चून वू वॉन यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आपल्या आजोबांच्या गुन्ह्यांसाठी खुलेआम माफी मागितली. माझ्या आजोबांनी हुकूमशहा असताना खूप मोठे गुन्हे केले. ते पापी व खुनी होते, असे ते म्हणाले.
दक्षिण कोिरयात 1980 मध्ये लोकशाही समर्थकांनी लष्करी हुकूमशाहीविरोधात निदर्शने केली होती. ते चिरडून टाकण्यासाठी तत्कालीन हुकूमशहा चून डू ह्वान यांनी 200 जणांची कत्तल केली होती.
माफी मागणारे कुटुंबातील पहिले सदस्य
चून वू वॉन आपल्या आजोबांच्या गुन्ह्यांसाठी माफी मागणारे त्यांच्या कुटुंबातील पहिले सदस्य आहेत. ग्वांग्जुचे नागरिक गत अनेक वर्षांपासून चून वू ह्वान यांच्या कुटुंबीयांकडे माफीची मागणी करत होते. आजोबांच्या कृत्यासाठी माफी मागितल्यानंतर चून वू आपल्या आजोबांच्या रोषाला बळी पडलेल्या नागरिकांच्या समाधीवरही गेले.
लष्करी हुकूमशाहीविरोधात निदर्शने करणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांनी चून यांचा माफीनामा स्वीकार केला. एकाने तर त्यांची पत्रकार परिषदेत गळाभेटही घेतली.
सैनिकांचा महिलांवर बलात्कार
बीबीसीच्या वृत्तानुसार, 1980 च्या दशकात दक्षिण कोरियातील हजारो नागरिक लष्करी हुकूमशाहीविरोधात रस्त्यावर उतरले होते. निदर्शनांच्या 9 व्या दिवशी दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू शहरात सैनिकांनी निदर्शकांवर अंदाधूंद गोळीबार केला. यासंबंधीच्या वृत्तानुसार, सैनिकांनी नागरिकांना निर्दयीपणे मारहाण करून त्यांचे लैंगिक शोषण केले.
निदर्शने चिरडून टाकण्यासाठी हेलिकॉप्टरनमधून गोळीबार करण्यात आला. लढाऊ विमानांतूनही बॉम्बफेक करण्यात आली. या हत्याकांडात 200 हून अधिक जणांचा बळी गेल्याचे सांगितले जाते.
2018 मध्ये स्वतः सरकारने या प्रकरणी अधिकृतपणे माफी मागितली होती. सैनिकांनी निदर्शक महिलांवर बलात्कार केल्याची बाबही सरकारने या प्रकरमी मान्य केली होती.
चून डू ह्वान यांनी मरेपर्यंत माफी मागितली नाही
1988 साली दक्षिण कोरियातील चून डू ह्वान यांची हुकूमशाही संपुष्टात आली. त्यानंतर 1996 मध्ये त्यांना भ्रष्टाचार व देशद्रोहाप्रकरणी दोषी ठरवून तुरुंगात पाठवण्यात आले. पण नंतर राष्ट्रपतींनी त्यांना क्षमादान दिले. बीबीसीच्या वृत्तानुसार, चून डू ह्वान यांनी आयुष्यभर आपल्या कृत्यासाठी माफी मागितली नाही. 2021 मध्ये 90 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.