आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेश दौरा:श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष गोतबाया राजपक्षे दुबईहून श्रीलंकेत परतले

कोलंबो23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष गोतबाया राजपक्षे दुबईहून मायदेशात परतले आहेत. श्रीलंकेची आर्थव्यवस्था सांभाळू न शकल्यामुळे गेल्या वर्षी राजपक्षे यांना सत्ता सोडावी लागली होती. यासोबत त्यांना परागंदा व्हावे लागले होते. स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसताच ते श्रीलंकेत परतले होते.श्रीलंकेत परतल्यानंतर त्यांचा दुबईचा पहिला विदेश दौरा होता.

डेली मिरर लंका वृत्तपत्राने एअरपोर्ट इमिग्रेशन डिपार्टमेंट प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले की, राजपक्षे आणि त्यांची पत्नी आयोमा गुरुवारी दुबईहून येथे बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत. वृत्तांनुसार, ते दुबईहून अमीरातीचे विमान ईके-६५० मधून आले आहेत. आपल्या दुबई दौऱ्यात राजपक्षे यांनी “फेम पार्क’ नावाच्या एका पशू फार्मला भेट दिली हाेती.

बातम्या आणखी आहेत...