आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबुल सुप्रियोंचा तृणमूलमध्ये प्रवेश:48 दिवसांपूर्वी दिला होता राजीनामा, राजकारण सोडण्याची केली होती घोषणा, आता म्हणाले - निर्णय बदलल्याचा अभिमान आहे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही - सुप्रियो

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार बाबुल सुप्रियो शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) सामील झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन बाबुल सुप्रियो यांना टीएमसीचे सदस्यत्व दिले. विशेष म्हणजे 48 दिवसांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर सुप्रियो यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. बाबुल यांनी राजकारण सोडण्यावरुन भाजपला सोडचिठ्ठी दिली होती असे सांगितले जात आहे.

टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर बाबुलने पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, ते म्हणाले की हे सर्व गेल्या 4 दिवसात घडले आहे. बंगालच्या जनतेचा ममतांवर विश्वास आहे. मी काम करण्यासाठी टीएमसीमध्ये सामील झालो असल्याचे ते यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले.

मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही - सुप्रियो
भाजपमधून राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर बाबुल म्हणाले होते की, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी भाजपचा सदस्य असून शेवटपर्यंत राहीन. परंतु, काही तासांनंतर त्यांनी हे ट्विटमध्ये बदल केले होते. या बदलानुसार, त्यांनी या ट्विटमधील 'मी शेवटपर्यंत भाजपसोबत राहीन' हे वाक्य कापले होते.

भाजपचे अनेक नेते पक्षाच्या संपर्कात - टीएमसी नेत्याचा दावा
टीएमसीचे कुणाल घोष यांनी बाबुल सुप्रियो यांच्या पक्षात सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. घोष म्हणाले की, भाजपचे अनेक नेते टीएमसीच्या संपर्कात असून ते भाजपवर समाधानी नाहीत. आज एक (बाबुल सुप्रियो) सामील झाले आहे, उद्या दुसरे सामील होऊ इच्छित आहे. ही प्रक्रिया निरंतर सुरु राहील, तुम्ही फक्त थांबा आणि पहा असे कुणाल घोष यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...