आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅमेझॉनच्या सीईओंची रेकॉर्डब्रेक कमाई:जेफ बेजोस यांनी एका दिवसात कमवले 97 हजार कोटी रुपये, एकूण संपत्ती 14 लाख कोटींच्या घरात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी अॅमेझॉनच्या शेयर्समध्ये 7.9 % वाढ, डिसेंबर 2018 नंतरची सर्वाधिक वाढ

अॅमेझॉनचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस (56) यांच्या संपत्तीत सोमवारी 13 अब्ज डॉलर (जवळपास 97,200 कोटी रुपये) ची वाढ झाली. 2012 मध्ये ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सच्या सुरुवातीपासून ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एका दिवसात एखाद्या व्यक्तीच्या संपत्तीत एवढी वाढ झाली आहे.

सोमवारी अॅमेझॉनच्या शेअर्समध्ये 7.9% वाढ झाली. ही वाढ डिसेंबर 2018 नंतरची सर्वाधिक वाढ आहे. कोरोनामुळे लोकांचा ऑनलाइन शॉपिंगकडे कल जास्त गेलआ हे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये यावर्षी 73% वाढ झाली आहे. यावर्षी बेजोस यांच्या संपत्तीत सलग वाढ होत आहे.

बेजोस यांची एकूण संपत्ती 189.3 बिलियन डॉलर झाली

बेजोस यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीसोबत त्यांची एकूण संपत्ती 189.3 बिलियन डॉलर (अंदाजे 14 लाख कोटी रुपये)झाली आहे. अमेरिका कोव्हिड-19 मुळे मंदीतून जात आहे, अशात बेजोस यांच्या संपत्तीत झालेली वाढ महत्वाची आहे. ताज्या आकडेवारीनुसार, बेजोस यांची संपत्ती एक्सॉन मोबिल कॉर्प, नाइकी आणि मॅकडोनाल्डच्या एकूण मार्केट व्हॅल्यूएशनपेक्षा जास्त आहे. तसेच, बेजोस यांची माजी पत्नी मॅकेंजी यांच्या संपत्तीमध्येही 4.6 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत त्या 13 व्या स्थानी आहेत.

जगातील टॉप-10 बिलेनियर्स

नावसंपत्ती (बिलियन डॉलरमध्ये)
जेफ बेजोस189.3
बर्नार्ड अरनॉल्ट एंड फैमिली114.6
बिल गेट्स113.4
मार्क जुकरबर्ग90.3
एलन मस्क74.2
मुकेश अंबानी73.5
स्टीव बाल्मर72.2
वॉरेन बफे72.0
लॅरी एलिसन71.9
लैरी पेज69.7
बातम्या आणखी आहेत...