आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्याच्या धावपळीच्या अायुष्यात लोक तणाव आणि चिंतेचा सामना करतात. कोणाल्या कामाची चिंता असते तर कोणी कुटुंबासाठी चिंतीत असतो. एकट्या अमेरिकेत ४ कोटी लोकांना एंग्झायटी डिसऑर्डरची समस्या आहे.
अशा स्थितीत आपल्याला स्वत:च्या पातळीवर तणाव आणि चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे शरीर आणि मेंदूला थाेडी विश्रांती मिळते. त्याची काळजी करण्यापेक्षा एंग्झायटी स्वीकारली पाहिजे. न्यूयॉर्कच्या न्यूरो सायन्टिस्ट तारा स्वार्ट यांनी तणाव आणि चिंता नष्ट करण्यासाठी अभ्यास सुचवला आहे. त्या म्हणाल्या, तणाव जाणवल्यास नाकातून दीर्घ श्वास घ्या आणि तो ५ सेकंदापर्यंत रोखून धरा. आता एका सेकंदासाठी पुन्हा श्वास घ्या आणि ३ सेकंदापर्यंत रोखा. ६ सेकंदात हळूहळू श्वास सोडा. असे तीनदा केल्याने कार्बन डायऑक्साइड जास्त चांगल्या पद्धतीने बाहेर पडतो. शरीराला आराम मिळतो. दीर्घ श्वास सोडल्याने हृदयाच्या रिसेप्टर्सवर दबाव वाढतो. मेंदूद्वारे हृदयाची गती कमी करण्याचा संदेश जातो. दुसरी कृती हॉफ सॅलामेंडर आहे. आरामदायक स्थितीत बसा आणि समोर बघा. डोके न फिरवता डोळ्याने उजवीकडे पाहा. आता डोके उजवीकडे फिरवा व ३०-६० सेकंद तसेच राहा. नंतर दुसऱ्या दिशेने असेच करा.
५-५-५ च्या कृतीतून तणाव कमी होतो आजूबाजूला दिसणाऱ्या ५ वस्तूंच्या नावांचा विचार करा. अासपासचे ५ ध्वनी लक्षपूर्वक ऐका. शरीराचे ५ अवयव फांदीसारखे हलवा. कान पिळा, डोके वर-खाली करा. ही कृती विनोदी वाटेल. मात्र, यामुळे शरीर तसेच मेंदूला आराम मिळत असल्याचे सांगण्यात येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.