आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटली:...आणि ढगांनी ओढले समुद्रातून पाणी; भूमध्य सागरामध्ये एकाच वेळी चार जलवादळे

राेमएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • समुद्रात 4 जलवादळे होण्याचे दृश्य कमी प्रमाणात दिसते.

इटलीत कॅलाब्रियाच्या समुद्रात नुकतेच अद्भुत दृश्य दिसले. ४ ऑगस्टला भूमध्य समुद्रात एकाच वेळी ४ जलवादळे दिसून आली. हे छायाचित्र अँड्रिया बोवा नावाच्या छायाचित्रकाराने काढले आहे.

काय असते जलवादळ :

जलवादळ एक प्रकारचे वादळ किंवा चक्रीवादळ आहे, जे पाण्यात तयार होते. मुख्यत्वे ते युरोप आणि अंटार्क्टिकात तयार होते. इतरत्र सहसा दिसत नाही. पाच टप्प्यांत तयार होते अन् ते थांबते. सुरुवातीला एक गडद वर्तुळ तयार होते. दुसऱ्या टप्प्यात ते फिरताना दिसते. नंतर अंगठीसारखे होते. चौथ्या टप्प्यात ते खांबासारखे होते आणि शेवटी थांबते. ते २० मिनिटांपेक्षाही कमी वेळात नष्ट होते.

बातम्या आणखी आहेत...