आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डब्ल्यूएचओचा अलर्ट:भारताचे चार कफ सिरप प्राणघातक, केंद्र सरकारने सुरू केली चौकशी

संयुक्त राष्ट्रे/जिनेव्हा/नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मेडन फार्मास्युटिकल्स या भारतीय कंपनीच्या चार औषधांविरोधात अलर्ट जारी केला आहे. या औषधांमुळे गाम्बियात ६६ मुलांचा मृत्यू झाला आहे. काही मुलांच्या किडनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा वापर सर्दी-खोकल्यात केला जातो.

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, प्रोमेथाजिन ओरल सोल्युशन, कोफेक्समालिन बेबी कफ सिरप, मेकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप यांचा समावेश आहे. या औषधांत डायथाइलीन ग्लाइकॉल आणि एथिलीन ग्लाइकॉल निश्चित प्रमाणापेक्षा जास्त आहे. या घटकांमुळे पोटदुखी, उलटी, जुलाब, डोकेदुखीसह रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. या अलर्टनंतर भारतात केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेने चौकशी सुरू केली. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, चारही कफ सिरपचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...