आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्रान्समध्ये सरकारने लाॅकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. एक वर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १० किलाेमीटरपर्यंतच्या प्रवासाची बंदी हटवण्यात आली आहे. आता लाेक देश तसेच परदेशात जाऊ शकतात. लवकरच आंतरराष्ट्रीय बंदीही हटवण्याची याेजना आहे. वर्षभरापासून घरात बंद तरुणांना मानसिकदृष्ट्या ताजेतवाने करण्यासाठी फ्रान्स सरकारने हाॅलिडे व्हाऊचर्स देण्याचे ठरवले आहे. त्या माध्यमातून सरकार अार्थिक मदत देखील करणार आहे. याेजनेत सहभागी हाेऊ इच्छिणाऱ्या लाेकांना जगभरातील १० हून जास्त ठिकाणी भेट देत येणार आहे. यात राेम, नीस, लिस्बेन, अॅम्स्टर्डम, अजाशियाे इत्यादी समुद्र किनारे व प्रमुख पर्यटन स्थळांचाही त्यात समावेश आहे.
फ्रान्सच्या हाॅलिडे व्हाऊचर्सनुसार यंदा नियमांत बदल करण्यात आले आहेत. आता १८-२५ वर्षीय तरुणांंना या याेजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यात येणे-जाणे, भाेजन आणि ७५ टक्के खर्च सरकार उचलणार आहे. त्यासाठी खर्चाची कमाल मर्यादा २०० युराे अर्थात सुमारे १८ हजार रुपये एवढी आहे. एएनसीव्हीचे संचालक डाॅमिनिक काेरट्जा म्हणाले, याेजनेच्या प्रचारासाठी नॅशनल सेंटर फाॅर युनिव्हर्सिटिज अँड स्कूल्ससाेबत संयुक्त याेजना तयारी केली जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना त्याचा लाभ घेता येऊ शकेल. त्याशिवाय ई-मेलद्वारे सुमारे २० लाख विद्यार्थ्यांपर्यंत पाेहाेचण्याचीही याेजना आहे. गेल्या वर्षी सुमारे ३८०० तरुणांनी याेजनेचा लाभ घेतला हाेता.
पहिल्यांदा नोंदणी, खर्चाचा तपशील देणे आवश्यक
याेजनेनुसार पहिल्यांदा नाेंदणी, खर्चाचा तपशील द्यावा लागेल. त्याची पडताळणी झाल्यानंतर मदत मिळेल. त्याचा लाभ इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नागरी सेवा स्वयंसेवक, दिव्यांग यांना या याेजनेचा लाभ मिळणार अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.