आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • France Airstrike In Mali, 50 Al Qaeda Terrorists Killed In Airstrikes; Large Quantities Of Weapons And Ammunition Seized

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रान्सची भारताप्रमाणे मालीवर एअरस्ट्राइक:अलकायदाचे 50 दहशतवादी ठार; मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि स्फोटके जप्त

बमाकोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्सने मालीमधील दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राइक केली आहे. दावा करण्यात येतोय की, या एअर स्ट्राइकमध्ये अलकायदाचे 50 दहशतवादी ठार झाले आहेत. बुर्कीना फासो आणि नाइजरच्या सीमेजवळ फ्रांसीसी ड्रोनला मोटरसायकवरुन जाणारा एक गट दिसला. यावर दोन मिराज विमानांमधून मिसाइल सोडण्यात आले. फ्रान्सच्या सैन्याचे प्रवक्ते कर्नल फ्रेडरिक बार्बरीने सांगितले की, यादरम्यान चार दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले आहे. तसेच, एक आत्मघाती जॅकेट जप्त करण्यात आले आहे.

फ्रांसने मागच्या आठवड्यात या परिसरात जिहादींविरोधात अभियान सुरू केले होते. फ्रांसच्या संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ली म्हणाल्या की, “मला एका महत्वाच्या ऑपरेशन बद्दल सांगायचे आहे. हे ऑपरेशन 30 ऑक्टोबरला करण्यात आले. या ऑपरेशन अंतर्गत 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले असून, मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.”

आयएस दहशतवाद्यांविरोधातही सुरू आहे ऑपरेशन

सैन्याचे प्रवक्ते बार्बरीने सांगितले की, मालीमध्ये आयएस दहशतवाद्यांची विंग ‘इस्लामिक स्टेट इन ग्रेटर सहारा’विरोधातही एक ऑपरेशन सुरू आहे. यात 3,000 सैनिकांना कामाला लावले आहे. हे ऑपरेशन एका महिन्यापूर्वी सुरू केले होते. या ऑपरेशनचे परिणाम येणाऱ्या काही दिवसात सांगितले जातील. युनायटेड नेशंसने शांती अभियानांतर्गत मालीमध्ये 13 हजार सैनिकांची तैनाती केली आहे. तर, फ्रांसने या परिसरात 5,100 सैनिकांना तैनात केले आहे.

धार्मिक संघर्षामुळे फ्रांसमध्ये दोन हल्ले

धार्मिक संघर्षामुळे मागील दोन आठवड्यांच्या आत झालेल्या दोन हल्ल्यांनी फ्रान्सला हादरवून टाकले आहे. आधी पैगंबर मोहम्मद यांचे कार्टून दाखवणाऱ्या शिक्षकाचा शिरच्छेद त्यांच्याच विद्यार्थ्यांनी केला. यानंतर नीसमधील चर्चसमोर चाकू भोसकून तिघांची हत्या करण्यात आली. शनिवारी देखील एका अज्ञात व्यक्तीने चर्चमध्ये पादरीला गोळी मारली.

राष्ट्रपती मॅक्रों यांनी हल्ल्याला इस्लामिक दहशतवाद म्हटले

मागील काही दिवसांपासून होत असलेल्या हल्ल्यामुळे सरकारने फ्रांसमध्ये सैनिकांची तैनाती वाढवली आहे. मैक्रों यांनी या घटनांना इस्लामिक दहशतवाद म्हटले आहे. यानंतर ते मुस्लिम देशांच्या नेत्यांच्या निशानिशाण्यावरन्यावर आहेत. अनेक देशात फ्रांसच्या सामानावर बहिष्कार टाकला जात आहे.