आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउष्णतेच्या लाटेने संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. त्यातही युरोप व अमेरिकेतील देश बेहाल आहेत. कारण या क्षेत्रात इतिहासात उष्णतेची लाट क्विचितच अनुभवाला आली. उष्णतेपासून बचावासाठी जगात वापरल्या जाणाऱ्या साधनांमुळेच उष्णतेत भर पडते. म्हणूनच फ्रान्ससह अनेक देशांनी या दिशेने केलेले प्रयोग लक्षणीय म्हणावे लागतात. उष्णतेच्या लाटेपासून संरक्षणासाठी रस्ते वाहनमुक्त करण्यापासून ते वास्तूकलेपर्यंत लोकांना दिलासा देण्याचे प्रयत्न होत आहेत.
अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातमध्ये पारा ५० अंश सेल्सियसपर्यंत जातो. त्यापासून बचावासाठी वास्तुकलेच्या कुलिंग तंत्राच्या प्राचीन पद्धतीला नवे रुप देऊन अबुधाबीने त्यासाठी प्रयत्न केला. इस्लामिक वास्तुकलेत जाळीदार संरचनेला मशराबिया म्हटले जाते. त्यामुळे प्रकाशात अडथळा येऊ न देता इमारतीला थंड ठेवण्याचे काम ही पद्धती करते. अल-बहर टॉवर याच धर्तीवर उभारले आहे. त्यात सुमारे १ हजार हेक्सागोनल शेड सेन्सरसोबत लावलेले आहेत. सूर्याची किरणे या छताला धडकून त्यांचा फैलाव होतो. यातून उष्णतेपासून सुटका होते. २५ मजली इमारतीमध्ये एसीची गरज ५० टक्क्यावर आल्याचे जाणवते.
व्हिएन्ना : ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामध्ये बहुतेक ठिकाणी एअर कंडिश्निंग नाही. मुलांसाठी शहरात स्प्लॅश पूल तयार केले आहेत. व्हिएनाच्या सुमारे १९ लाखांच्या लोकसंख्येसाठी ११०० जास्त पेयजल फवारे उपलब्ध आहेत. लोकसंख्येला आल्हाददायक वाटावे असे वातावरण निर्माण करण्याचे काम या व्यवस्थेतून होते. त्यामुळे उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.
पॅरिस : फ्रान्सच्या राजधानीतील तापमान यंदा ४० अंश सेल्सियसवर पोहोचले. त्यापासून संरक्षणासाठी शहरात सुमारे ८०० कूलिंग स्पॉट्स तयार केले आहेत. पॅॅरिसमधील नागरिक एका अॅपच्या साह्याने ते ठिकाण गाठू शकतात. कारंजी, एसी संग्रहालय इत्यादी या ठिकाणी आहेत. अशा ठिकाणांना आता कूल आयलंड असे देखील संबोधले जात आहे. सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी तेथे जायला केवळ ७ मिनिटे लागतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.