आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्रान्सचा आयफेल टॉवर व अमेरिकेचा सिटी ग्रुप हे त्या-त्या देशांच्या कष्टाचे प्रतिक नाही. तर हैती नामक कॅरिबियन समुद्रात वसलेल्या गरीब देशाच्या आर्थिक शोषणातून ते उभारण्यात आलेत. काही दस्तावेजांनुसार, फ्रान्स व अमेरिकेने आळीपाळीने हैतीचे आर्थिक शोषण करुन आपली संपन्नता वाढविली. हैती फ्रान्सच्या गुलामगिरीत होता. फ्रान्सिसी येथील कृष्णवर्णीयांकडून ऊसाच्या शेतीत मोलमजुरी करवून आपले उखळ पांढरे करवून घेत होते.
हैतीच्या जनतेने स्वातंत्र्यासाठी विद्रोह केला. नेपोलियनच्या सैन्याला पराभूत केले. त्यानंतर 1804 मध्ये त्यांना सशस्त्र स्वातंत्र्य मिळाले. 25 सप्टेबर 1980 रोजी हैतीला 1.5 लाख कोटी रुपये देण्यास सांगण्यात आले. हैती प्रदिर्घ काळापर्यंत हे कर्ज फेडताना पुरता कंगाल झाला. याच पैशाने फ्रान्सला समृद्धी आली व त्याने आयफेल टॉवरची बांधणी केली. हे टॉवर बांधण्यासाठी 300 मजुरांनी सलग 2 वर्ष 2 महिने व 5 दिवसांपर्यंत घाम गाळला.
हैती या कर्जातून सावरल्यानंतर फ्रान्सने तिथे एक राष्ट्रीय बँक उघडली. या बँकेत तेथील जनतेचा पैसा गोळा केला व त्याच पैशातून त्यांना कर्ज देणे सुरू केले. यामुळे हैती पुन्हा कर्जाच्या डोंगराखाली दबला गेला. अमेरिकेनेही हैतीला कंगाल करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. याच प्रकारे अमेरिकेचा सिटी ग्रुप हैतीच्या पैशावर उभा राहिला.
नॅश्नल बँक हेती सरकारकडूनही प्रत्येक व्यवहारावर शुल्क घेत होती
हैतीत क्रेडिट इंडस्ट्रियलने जी राष्ट्रीय बँक स्थापन केली. ती हैती सरकारकडूनही प्रत्येक व्यवहारावर शुल्क घेत होती. यातून फ्रान्ससच्या शेअरधारकांनी एवढा पैसा कमावली की त्यांचा नफा हैती सरकारच्या अर्थसंकल्पाहून जास्त झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.