आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रांसमध्ये दहशतवादी हल्ला:भर रस्त्यात महिलेचा शिरच्छेद; चर्चबाहेरही दोन जणांची चाकू भोसकून हत्या

पॅरिसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रांसमध्ये 15 दिवसात दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ला झाला आहे. नीस शहरात हल्लेखोरांनी भररस्त्यात एका महिलेचा शिरच्छेद केला, तसेच चर्चबाहेर दोघांची चाकू भोसकून हत्या केली. नीसचे महापौरर क्रिस्टियन एट्रोसीने याला दहशतवादी घटना म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीस शहरातील चाकू हल्ल्याची घटना आजची आहे. हल्लेखोराने नोट्रे डैम चर्चजवळ काही लोकांवर अचानक हल्ला चढवला. यादरम्यान एका महिलेचा शिरच्छेद करुन इतर दोघांना चाकू भोसकला. काही दिवसांपूर्वी फ्रांसमध्ये पैगम्बर साहब यांचे कार्टून वर्गात दाखवणाऱ्या एका इतिहासाच्या शिक्षकाची क्रुरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेपासून फ्रांस सरकार इस्लामिक संघटनाविरोधात कठोर कारवाई करत आहे. जगातील अनेक देशांनी फ्रांसच्या या कारवाईचा निषेध केला आहे.