आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • France To Give 20,000 Indian Students A Chance To Learn In Three Years, Modi Discusses Startup With Macron

फ्रान्स दौरा:20  हजार भारतीय विद्यार्थ्यांना तीन वर्षांत शिकण्याची संधी देणार फ्रान्स, मोदींची मॅक्रॉनसोबत स्टार्टअपवर चर्चा

पॅरिस16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्स आपल्याकडे २०२५ पर्यंंत २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी देण्याच्या तयारीत आहे. यामुळे भारत आणि फ्रान्समध्ये नवे व्यापार, स्टार्टअप आणि इनोव्हेशनच्या संधी निर्माण होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रेंच राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात बुधवारी झालेल्या परिषदेनंतर जाहीर केलेल्या एका प्रसिद्धिपत्रकातून ही माहिती मिळाली. दोन्ही पक्षांनी विद्यार्थी, कुशल कामगार, व्यावसायिकांची हालचाल संयुक्तरीत्या वाढवण्याच्या पद्धतींवर चर्चा केली. तसेच वाहतूक व स्थलांतराशी संबंधित भागीदारी करार लागू करण्यास कटिबद्धता दाखवली. मोदी ३ युरोपीयन देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात फ्रान्सला गेले. त्यांनी जर्मनी, डेन्मार्कमध्ये व्यापार, ऊर्जा, हरित तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत संबंध घट्ट करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...