आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • France To Supply 8 High Capacity Oxygen Generators And Ventilators To India; France Will Also Send 5 Days Of Liquid Oxygen For 2000 Patients

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाविरोधातील लढाईत दोन्ही देश एकत्र:भारताला 8 हाय कॅपेसिटीचे ऑक्सिजन जनरेटर आणि व्हेंटिलेटर देणार फ्रान्स, 2000 रुग्णांसाठी 5 दिवसांचे लिक्विड ऑक्सिजनही पाठवणार

पॅरिस11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक देश भारताला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत

भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात प्रभावित देश आहे. येथे दररोज 3 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर येत आहेत. चीन, सौदी अरब, अमेरिकेसह अनेक देश भारताच्या मदतीने पुढे गेले आहेत. आता फ्रान्सनेही भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रान्स सरकारने घोषणा केली आहे की, कोरोनाच्या या लढाईमध्ये ते भारताला लवकरात लवकर मदत पोहोचवतील.

फ्रान्स भारताला 8 हाय कॅपेसिटीचे ऑक्सिजन जनरेटर देणार आहे, या व्यतिरिक्त 5 दिवसांचे 2000 रुग्णांसाठी लिक्विड ऑक्सिजन पाठवेल. यासोबतच 28 व्हेंटिलेटर आणि ICU चे इक्विपमेंट्सही ते भारताला देतील. ही माहिती फ्रान्सचे राजदूत इमॅनुएल लॅनेन सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

लॅनेन म्हणाले - दोन्ही देशांमध्ये एकता मिशन आठवड्याच्या अखेरीस सुरू केले जाईल
लॅनेन यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की राष्ट्रपती इमॅन्युएल लॅनेन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या एकता अभियानाला भारत आणि युरोपियन संघातील फ्रेंच कंपन्यांचा पाठिंबा आहे. या मोहिमेची सुरुवात आठवड्याच्या शेवटी होईल. हवाई व समुद्राद्वारे मदत दिली जाईल.

या जनरेटरच्या मदतीने रुग्णालये स्वतः ऑक्सिजन बनवू शकतात
जे 8 ऑक्सिजन जनरेटर पुढे पाठवले जातील त्याला फ्रान्सच्या SME ने बनवले आहे. पुढील दहा वर्षात, या जनरेटरच्या मदतीने रुग्णालये स्वतः ऑक्सिजन तयार करण्यास सक्षम असतील. हे मशीन हवेमधून वैद्यकीय ऑक्सिजन देखील बनवू शकते. प्रत्येक मशीन रुग्णालयाच्या 250 खाटांना सतत ऑक्सिजन पुरवू शकते. ते एकाच वेळी 15 गंभीर कोरोना रुग्णांना, आयसीयूमध्ये दाखल केलेल्या 30 रूग्ण आणि 150 गरजू रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी सक्षम आहे.

या ऑक्सिजन जनरेटरच्या मदतीने, ऑक्सिजन सिलेंडर, लिक्विड ऑक्सिजन कंटेनर भरू शकतो. पहिल्या शिफ्टमध्ये 5 मशीन्स पाठवल्या जातील. या मशीन्समुळे दररोज 10 हजार रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. तसेच विशेष वैद्यकीय उपकरणे, 28 व्हेंटिलेटर आणि 200 इलेक्ट्रिक सिरिंज पंप पाठवले जातील. त्याआधी रविवारी फ्रान्सचे राष्ट्रपती म्हणाले होते की कोरोनाविरूद्धच्या लढाईत आम्ही भारताला मदत करण्याची योजना तयार करत आहोत.

अनेक देश भारताला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत
फ्रान्सशिवाय अनेक देशांनी भारतासाठी मदत आणली आहे. यामध्ये अमेरिका, सौदी अरेबिया, चीन, इराण, रशिया, ब्रिटन सारख्या देशांचा समावेश आहे. सोमवारी 318 ऑक्सिजन कंसंट्रेटर अमेरिकेतून दिल्ली विमानतळावर पोहोचले. यापूर्वी अमेरिकेने लसीच्या कच्च्या मालावरील बंदी हटवून तातडीने कच्चा माल भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, सौदी अरेबियाच्या दमाम बंदरातून 4 क्रायोजेनिक टाक्यांमध्ये 80 टन ऑक्सिजनची खेप भारतासाठी रवाना झाली आहे. त्याचबरोबर चीनही भारताच्या गंभीर परिस्थितीला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारताने आपल्या विशेष गरजा सांगितल्यास आम्ही मदतीसाठी तयार आहोत.

बातम्या आणखी आहेत...