आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबऱ्याचदा नोकरदार लोक बर्नआऊटची (तणाव व नैराश्य) तक्रार करताना दिसतात. मात्र, युवा उद्योजक कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कामात बुडालेले दिसतात. असे असतानाही ते बर्नआऊट होत नाहीत. याबाबत नेदरलँडच्या अॅम्सरडॅम विद्यापीठाने संशोधन केले .
या संशोधन अहवालानुसार, उद्योजकांना काम करण्याचे स्वातंत्र्य आणि कोणत्याही एखाद्या कामामागे लागण्याच्या सक्रियेतेमुळे त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यांच्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभातून त्यांच्यात सकारात्मक ऊर्जेचा स्रोत तयार होतो. हा जास्त काम केल्यावरही थकू देत नाही. प्रमुख संशोधक प्रा. ओब्जचोंका यांनी सांगितले की, कामाचा तणाव आणि वेळेचा दबाव उद्याेजकांना उच्च पातळीच्या वैयक्तिक कार्य स्वायत्तता प्रदान करते. हे सर्व त्यांना सकारात्मक मनोवैज्ञानिक स्थितीकडे घेऊन जाते. जे उद्योजक कामात आपल्या मोठ्या भागीदारीचे कारण बनतात. ते पगारदार कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जास्त ऊर्जा आणि मनाची अधिक सकारात्मक स्थिती प्रदान करतात. याशिवाय ते आपल्या कामातून आनंद आणि जास्त समाधानीही राहतात. कुण्या अन्य कर्मचाऱ्यांसाठी जबाबदार नसतानाही ते बर्नआऊटचे बळी पडत नाहीत. असे असले तरी, ते व्यवसाय विस्तार करत असतील व जास्त कर्मचाऱ्यांना कामावर ठेवत असतील तर ते बर्नआऊटची जोखीम वाढते. आपल्या सोबत कर्मचाऱ्यांच्याही बर्नआऊट जोखमीची जागरुकता असायला हवी.
उद्योजक दृष्टिकोनातून बर्नआऊटपासून दूर राहता येईल उच्च जोखमीच्या नोकरीच्या कर्मचाऱ्यांसाठी उद्योजकाचा दृष्टिकोन फायदेशीर असतो. यामुळे ते बर्नआऊटचे बळी होण्यापासून वाचू शकतात.दुसरीकडे, आपले काम बळकट करुन सकारात्मक ऊर्जेने काम करू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.