आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Freight Ship Stuck In Suez Canal For Six Days Was Evacuated, Loss Of More Than 50 Thousand Million Dollars So Far

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक व्यापारासाठी चांगली बातमी:सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय जहाज हटवण्यात यश, आतापर्यंत 5 हजार कोटी डॉलरचे नुकसान

कैरो24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे जहाज अडकल्यामुळे कच्चा तेलाच्या किमतीमध्येही वाढ झाली

मागील सहा दिवसांपासून इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय जहाज हटवण्यात यश मिळाले आहे. हे जहाज आशियातून यूरोपात माल घेऊन जाण्याचे काम करते. कालव्यात जहाज अडकल्यामुळे 150 पेक्षा जास्त जहाजांच्या रांगा लागल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जहाज अडकल्यामुळे इतर जहाजांना वेळेवर पोहचता आले नाही आणि त्यामुळे 5 हजार कोटी डॉलरचे नुकसान झाले आहे. इन्च केप शिपिंग सर्व्हिसेजने सांगितले की, या महाकाय जहाजाला थोड्या प्रमाणात हटवण्यात आले असून, ट्रॅफिक क्लिअर झाले आहे.

ट्रॅफिकजाम झाल्यामुळे झाले नुकसान

सुएझ कालव्यातून जहाज येणे बंद झाल्यामुळे सर्वाधिक नुकसान यूरोपला झाले आहे. यामुळे खाण्या-पिण्याच्या गोष्टींवरही परिणाम झाला होता. जगातील 12 % व्यापार युएज कालव्यातून होतो. पुरवठ्यात उशीर होणार असल्याच्या संशयावरुन लंडनमध्ये रोबस्टाच्या फ्यूचर्समध्ये 2.8% वाढ झाली. मे डिलीव्हरी आणि जुलै डिलीव्हरीच्या फ्यूचर्सदरम्यान असलेला फरक 30% ने वाढला. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीही वाढल्या.

युएझ कालव्यात अडकलेले 'द एव्हर ग्रीन' जहाज 1300 फूट लांब आहे.
युएझ कालव्यात अडकलेले 'द एव्हर ग्रीन' जहाज 1300 फूट लांब आहे.
बातम्या आणखी आहेत...