आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • French Financial Crimes Branch Of France’s Public Prosecution Services Starts Investigation On Rafale Deal; News And Live Updates

फ्रान्समध्ये राफेल कराराची चौकशी सुरु:इमॅन्युएल मॅक्रॉन आणि माजी पंतप्रधान फ्रांस्वा ओलांद यांची होणार चौकशी; राहुल गांधी यांनी केले होते आरोप

पॅरिसएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताने 59 हजार कोटींचा करार केला होता

फ्रान्समध्ये राफेल करारावरून चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. फ्रेंच माध्यमाच्या माहितीनुसार, या करारात भ्रष्ट्राचारावितिरिक्त पक्षपात करण्याच्या आरोपांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे पीएनपीने म्हटले आहे.

फ्रेंच एनजीओ शेरपाने केली होती तक्रार
संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी फ्रेंच एनजीओ शेरपाने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मीडियापार्ट संबंधित प्रकरणावर सलग अहवाल प्रसिद्ध केला होता. परंतु, पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेजने चौकशीच्या मागणीला फेटाळून लावले होते.

भारताने 59 हजार कोटींचा करार केला होता
फ्रान्स आणि भारतात राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 59 हजार कोटी रुपयांचा करार झाला होता. यावेळी फ्रांस्वा ओलांद हे पंतप्रधान तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे अर्थमंत्री असून त्यांनीच या करारावर साईन केली होती. त्यामुळे आजी माजी पंतप्रधानांची चौकशी केली जाणार असून त्यांना याची उत्तरे द्यावी लागणार आहे.

भारताले आतापर्यंत केवळ 21 राफेल मिळाले
या करारानुसार भारताला फ्रान्सकडून 36 राफेल मिळणार होते. परंतु, भारतीय वायूसेनेला आतापर्यंत केवळ 21 राफेल लढाऊ विमान उपलब्ध झाले आहे. भारताने 2016 मध्ये दसॉ एव्हिएशन कंपनीकडून या राफेलाची खरेदी केली होती.

राहुल गांधी यांनी केले होते आरोप
राफेलच्या या करारावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आरोप केले होते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकार याप्रकरणी टिकेची झोड उठवली होती. त्यांनी संबंधित प्रकरणात मोदी यांनी माझ्या तीन प्रश्नांचे उत्तरे द्यावे अशी एका पत्राव्दारे मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...