आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियन हल्ल्यात बालंबाल बचावला फ्रेंचचा रिपोर्टर:लाईव्ह रिपोर्टिंग करताना पाठीमागील मिसाईल कोसळली, व्हिडिओ झाला व्हायरल

डोनेट्स्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनमधून लाईव्ह रिपोर्टिंग करणारा एक फ्रेंच पत्रकार रशियन मिसाईल हल्ल्यातून बालंबाल बचावला आहे. सद्या या हल्ल्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. रिपोर्टर पॉल गॅसनियर टीव्ही चॅनल TMC च्या Quotidian नावाच्या कार्यक्रमाचे लाईव्ह रिपोर्टिंग करत होते.ल यादरम्यान रशियन क्षेपणास्त्र त्यांच्या पाठीमागील काही भागात काही मीटर अंतरावरच पडले.

क्षेपणास्त्र पडताच मोठा आवाज होऊन स्फोट झाला. अचानक झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याने पत्रकार पॉल पूर्णपणे घाबरले. ते अतिशय वेगाने जीव वाचवण्यासाठी धावले. युक्रेनमध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या अनास्तासिया मागाजोवा नामक व्यक्तीने हा ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहले की, रिपोर्टर पॉल आणि त्यांचा साथीदार कॅमेरामन सुरक्षित आहे.

दुसर्‍या अन्य कार्यक्रमादरम्यान पॉल गॅसनियर रिपोर्टिंग करतानाचा हा फोटो आहे.
दुसर्‍या अन्य कार्यक्रमादरम्यान पॉल गॅसनियर रिपोर्टिंग करतानाचा हा फोटो आहे.

क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जण जखमी

मेट्रो यूकेच्या बातमीनुसार, रिपोर्टर डोनेस्तक प्रांतातील ड्रुझकिव्हका शहरात रिपोर्टिंग करत होता. यादरम्यान त्यांच्या मागे सुमारे 200 मीटर अंतरावरील हॉटेल आणि आइस हॉकी मैदानावर क्षेपणास्त्र डागले गेले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात कोणत्याही पत्रकाराला इजा झालेली नाही. मात्र अन्य दोघे जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...