आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्समध्ये आता निरोध मोफत मिळणार:लैंगिक संसर्ग आणि नको असलेली गर्भधारणा रोखण्याचा प्रयत्न, मॅक्रॉन सरकारचा निर्णय

पॅरिस3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 18 ते 25 वयोगटातील सर्व तरुणांना मोफत (कंडोम) देण्याची घोषणा केली आहे. जानेवारीपासून फ्रान्समधील तरुणांना कंडोम खरेदीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. फ्रान्समध्ये एड्स आणि इतर लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआय) चा प्रसार रोखणे हे या निर्णयाचे कारण आहे. यासोबतच नको असलेली गर्भधारणा देखील आटोक्यात आणायची आहे.

मॅक्रॉन यांनी 2030 पर्यंत फ्रान्सला 'नवीन एचआयव्ही रुग्णांपासून मुक्त' करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. फ्रान्समध्ये 2020 आणि 2021 मध्ये लैंगिक संक्रमित संसर्गाच्या प्रकरणांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर 2021 मध्ये एचआयव्हीची सुमारे 5000 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी मोफत कंडोम देण्याची घोषणा केली आहे
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी मोफत कंडोम देण्याची घोषणा केली आहे

26 वर्षाखालील महिलांसाठी गर्भनिरोधक मोफत

दरम्यान, सरकारने 26 वर्षांपर्यंतच्या सर्व महिलांसाठी गर्भनिरोधक मोफत केले. जेणेकरून कोणतीही मुलगी किंवा महिला पैशाअभावी गर्भनिरोधकापासून वंचित राहू नये. सुमारे 30 लाख मुली आणि महिलांना याचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी केवळ 18 वर्षांखालील मुलींनाच गर्भनिरोधक मोफत मिळत होते. एसटीआयला आळा घालण्यासाठी फ्रान्समध्ये इतरही अनेक आरोग्य मोहिमा राबवल्या जात आहेत. फ्रान्समधील तरुणांना STI ची शंका असल्यास त्यांची मोफत चाचणी करता येते.

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी याचे वर्णन प्रतिबंधाच्या दिशेने केलेली छोटी क्रांती असे केले आहे. मॅक्रॉन म्हणाले की, लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत फ्रान्स फारसा चांगला नाही. वास्तविकता सिद्धांतापेक्षा खूप वेगळी आहे. या क्षेत्रात आपण लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की फ्रान्समधील चारपैकी एक तरुण नवीन जोडीदारासोबत सेक्स करताना कंडोम अजिबात वापरत नाही किंवा क्वचितच.

फ्रान्समध्ये गर्भनिरोधक उपायांना सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे
फ्रान्समध्ये गर्भनिरोधक उपायांना सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे

फ्रेंच तरुणांमध्ये STI प्रकरणे वाढत आहेत

फ्रेंच तरुणांमध्ये क्लॅमिडीया आणि गोनोरिया सारख्या STI चे प्रमाण वाढत आहे. 2012 आणि 2016 दरम्यान, क्लॅमिडीया आणि गोनोरियाच्या प्रकरणांमध्ये तिप्पट वाढ झाली. 2012 मध्ये क्लॅमिडीयाची 76,918 प्रकरणे होती, जी 2016 मध्ये वाढून 267,097 झाली. तर 2012 मध्ये गोनोरियाची 15,067 प्रकरणे होती, जी 2016 मध्ये 49,628 झाली. त्याच वेळी, 2017 आणि 2019 दरम्यान, 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये STI ची 45 टक्के अधिक प्रकरणे दिसून आली.

अमेरिकेत दहा वर्षांत प्रकरणे दुप्पट झाली

अमेरिकेतील तरुणांमध्ये कंडोम न वापरण्याची सवय वाढत आहे. त्यामुळे STI प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 2021 मध्ये सिफिलीस, क्लॅमिडीया आणि गोनोरियाची सुमारे 25 लाख प्रकरणे नोंदवली गेली. एका दशकात या प्रकरणांची संख्या दुप्पट झाली आहे. यातील निम्म्याहून अधिक प्रकरणे 15 ते 24 वयोगटातील तरुणांमध्ये आढळून आली.

2010 ते 2019 या काळात भारतात नवीन एचआयव्ही रुग्णांमध्ये 37 टक्के घट झाली आहे. कुटुंब आणि कल्याण मंत्रालयाच्या 2019 च्या अहवालानुसार, भारतात 23.49 लाख लोक एचआयव्ही विषाणू/एड्सने बाधित आहेत. भारतातही कंडोमचा वापर वाढवण्यासाठी सातत्याने मोहिमा राबवल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...