आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैगंबर कार्टून वाद:फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रों म्हणाले - मुस्लिमांचा सन्मान करतो, मात्र हिंसा सहन केली जाणार नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फ्रान्सनंतर कनाडामध्येही एका व्यक्तीने काही लोकांवर चाकूने हल्ला केला.

इस्लामला दहशतवादासोबत जोडल्यामुळे टीकेचा सामना करत असलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुअल मॅक्रों यांचे महत्त्वाचे वक्तव्य समोर आले आहे. मॅक्रों यांनी शनिवारी म्हटले की, ते मुस्लिमांचा सन्मान करतात. मी समजू शकतो की, मुस्लिम पैगंबर मोहम्मद यांचे कार्टून बनवले गेल्यामुळे दुखावले आहेत. असे असले तरीही याची प्रतिक्रिया म्हणून हिंसा सहन केली जाऊ शकत नाही.

धार्मिक वादामुळे दोन आठवड्यांमध्ये झालेल्या दोन हल्ल्यांनी फ्रान्सला धक्का दिला आहे. पहिले क्लासमध्ये वादग्रस्त कार्टून दाखवणाऱ्या शिक्षकाचे डोके त्यांच्याच विद्यार्थ्यांनी छाटले. यानंतर नीस शहरामध्ये चर्च बाहेर चाकू मारुन एका महिलेसह तीन लोकांची हत्या करण्यात आली. शनिवारीही एका अज्ञात बंदूकधारीने चर्चमध्ये पादरींना गोळी मारली होती. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

हल्ल्यांना म्हटले होते इस्लामिक दहशतवाद
सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे सरकारने फ्रान्समध्ये तैनात सैनिकांची संख्या दुप्पट केली आहे. मॅक्रों यांनी या घटनांना इस्लामिक दहशतवाद असे म्हटले होते. यानंतर पासून ते मुस्लिम देशांच्या नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. अनेक देशांमध्ये फ्रांसीसी साहित्यावर बहिष्कार घालण्यासाठी अभियान सुरू आहे.

'कार्टूनचे समर्थन करत नाही'
एका मीडिया हाउससोबत बोलताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, संपूर्ण प्रकरण चुकीच्या पध्दतीने समजले जात आहे. ते मोहम्मत पैगंबर यांच्या कार्टूनचे समर्थन करत नाही. या कार्टूनने अनेक लोकांच्या भावनांना ठेस पोहोचली आहे. यानंतरही देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे संरक्षण केले जाईल. यामध्ये कार्टून छापनेही सामिल आहे.

फ्रान्सनंतर कनाडामध्येही चाकूहल्ला, दोन जणांचा मृत्यू
फ्रान्सनंतर कनाडामध्येही एका व्यक्तीने काही लोकांवर चाकूने हल्ला केला. क्यूबेक सिटीमध्ये रविवारी झालेल्या या घटनेमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. 5 लोक जखमीही झाले आहेत. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांननी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. एका संशयिताला पकडण्यात आले आहे. बोलले जात आहे की, हल्लेखोराने प्राचिन योद्ध्यांसारखे पोषाख घातले होते. या हल्ल्यानंतर पोलिसांनी लोकांना घरात राहणे आणि हल्ल्याच्या ठिकाणी न जाण्याची अपील केली आहे.