आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवायत:लीकमुळे घाबरलेल्या फेसबुकचा अंतर्गत व्यवस्थेला आता लगाम!

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुकने आता अंतर्गत रचनेत सुधारणा करण्याच्या कवायतीस सुरुवात केली आहे. त्यामागे माजी प्राॅडक्ट मॅनेजर फ्रान्सिस हाेगेन यांनी अमेरिकन सिनेटमध्ये दिलेली ग्वाही महत्त्वाची ठरली आहे. कारण त्या ग्वाहीमध्ये हाेगेन यांनी फेसबुकमधील सुरक्षेसंबंधीच्या तकलादू बाजू उघड केल्या हाेत्या. फेसबुक ग्राहकांच्या सुरक्षेएेवजी आपल्या नफ्यावर केंद्रित आहे. फेसबुकने आता कर्मचाऱ्यांना एक निर्देश दिला आहे. अंतर्गत मेसेज लीक करू नये, असे निर्देश त्यांनी दिले. आता फेसबुक इंटर्नल मेसेज बाेर्डवर एक मेसेज येताे. कृपया लीक करू नये, असा आमचा आग्रह आहे.

कर्मचाऱ्यांत मतभेदही : फेसबुकने दिलेल्या निर्देशांबाबत कर्मचाऱ्यांत मतभेदही दिसून येतात. काही कर्मचाऱ्यांनी त्यास पाठिंबा दिला आहे. काही कर्मचाऱ्यांनी हे पाऊल कंपनीची पारदर्शकता व समन्वय धाेरणाच्या विरुद्ध आहे. कंपनीचे हे पाऊल म्हणजे पलटवारही ठरू शकतात. लीकच्या घटनाही वाढू शकतात. त्यामुळे तूर्त तरी कंपनीने जगभरात सुरू असलेल्या चर्चेनंतर काही उपाययोजनांची तयारी केल्याचे दिसते.

मुलांसाठी याेग्य नाही, झुकेरबर्ग यांनी सुधारणा करावी
ब्रिटनमध्ये मुलांच्या हक्कासाठी काम करणारी संघटना चाइल्ड रेस्क्यू काेएलेशनने फेसबुक सीईआे मार्क झुकेरबर्ग यांना पत्र पाठवले. फेसबुक आता पालकांचा विश्वास गमावत आहे. कारण फेसबुक मुलांसाठी याेग्य नाही. त्यासाठी विशेष फीचर्स घातक आहे. ते म्हणाले, केवळ फेसबुकच नव्हे तर इन्स्टाग्राम, व्हाॅट्सअॅप मेसेजिंगचाही मुलांच्या मानसिक विकासावर प्रतिकूल परिणाम हाेताे.

सुधारणांसाठी चार उपाय
- मुलांच्या आराेग्यासाठी फेसबुकद्वारे अंतर्गत संशाेधन शेअर करावे.
- मुलांच्या लैंगिक शाेषणाला राेखण्यासाठी फेसबुकने आतापर्यंत काय उपाय केले?
- फेसबुक आणि त्यांचे इतर प्लॅटफाॅर्म मुलांवर कशा प्रकारे परिणाम करतात?
- एनक्रिप्टेड मेसेजिंगचा मुलांवर हाेणारा परिणाम जाहीर केला.

बातम्या आणखी आहेत...