आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Frightened People Began To Return From The Airport; In America, The Situation Of People Working For Foreign Governments Is Deplorable; News And Live Updates

अफगाणिस्तान वाद:घाबरलेले लोक विमानतळावरून परतू लागले; अमेरिका, परदेशी सरकारसाठी काम करणाऱ्या लोकांची परिस्थिती दयनीय

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काबूल विमानतळाबाहेर 30 हजारांवर गर्दी, निराशेमुळे परत जावे लागले

काबूलच्या एकमेव विमानतळाबाहेर दयनीय स्थिती आहे. येथील परिस्थिती पाहिल्यास संपूर्ण अफगाणिस्तानच देश सोडण्याच्या तयारीत वाटू लागतो. लोक स्वत:च्या बचावासाठी कोणत्याही स्थितीत देश सोडू इच्छितात. कोणत्याही ठिकाणी, कोणताही देश, कोणतेही काम करण्याची अफगाणिस्तानच्या लोकांची तयारी आहे. त्यांना तालिबानचे गुलाम होण्याची इच्छा नाही. लोकांकडे उड्डाणासाठी आवश्यक दस्तऐवजदेखील नाहीत. देश साेडण्यासाठी विमानतळाबाहेर धडपडणाऱ्यांची संख्या ३० हजारांहून जास्त अाहे. हजारो लोक विमानतळाच्या आत प्रतीक्षेत आहेत. काबूल व आजूबाजूच्या शहरातील सेफहाऊसमध्ये लोक मोठ्या संख्येने दडून बसले आहेत. त्यांना व्हिसा मंजूर होईल अशी अपेक्षा आहे. गुप्तचर विभाग किंवा उच्च पदावर राहिलेल्या व्यक्तींचादेखील घरोघर शोध घेतला जात आहे. विमानतळावरील परिस्थिती दयनीय होत चालल्याची माहिती उड्डाणाची प्रतीक्षा करत असलेल्या एका पत्रकाराने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली. व्हिसा आणि इतर कागदपत्रे नसतानाही लोकांना उड्डाण करण्याची घाई आहे.

तालिबानने वर्चस्व मिळवल्याने सगळी कार्यालये बंद झाली आहेत. त्यामुळे पुरेसी कागदपत्रे मिळवता आलेली नाहीत. काही लोकांकडे अपूर्ण कागदपत्रे आहेत. विमानतळावरील पुरुष, मुले-महिलांची स्थिती वाईट आहे. सगळे भेदरलेले आणि थकलेले आहेत. एक कुटुंब म्हणाले, आमचे मन आणि मेंदू दोन्ही अश्रू ढाळू लागले आहेत. मातृभूमी सोडण्याव्यतिरिक्त आमच्या हाती काही नाही. भीती व अराजकतेमुळे घर सोडणे नरसंहारापेक्षा कमी नाही. तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानात सर्वकाही सामान्य वाटते. परंतु प्रत्यक्ष तसे नाही. लोक प्रचंड तणाव, भीतीखाली वावरत आहेत. लोक तालिबानवर कसा विश्वास ठेवू शकतात? कारण वर्षानुवर्षांपासून जाहीर हत्या करत आले आहे. महिला, निर्दोष लोकांवर बॉम्बवर्षाव करत आहे. ते केवळ शांतीचे पाईक असल्याचे ढोंग करत आहेत. अफगाणिस्तानातील विविध सेफ हाऊसमध्ये लपून बसलेल्या लोकांशीदेखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेसोबत काम करणाऱ्या एका तरुण दुभाषीने नाराजी व्यक्त केली. १५ ऑगस्टपासून आमचे जीवन पार बदलून गेले आहे.

अमेरिकेने आमची फसवणूक केली आहे. आम्ही त्यांच्या मदतीसाठी स्वत:चा जीव संकटात टाकला. मात्र ते आम्हाला शत्रूच्या हवाली करत आहेत, असे तरुणीने सांगितले. रशियातून लष्करी शास्त्रात पदव्युत्तर पदवी करणारी पहिली महिलादेखील काबूलमध्ये अडकली आहे. तिने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. विमानतळावर रात्र काढूनही मदत मिळू शकली नाही. फोनवर घाबरलेल्या स्वरात एक महिला पत्रकार म्हणाली, मॅम, मी माझे आेळखपत्र जाळून टाकत आहे. माझे घरही सोडले. मी एक पत्रकार आहे. माझे वडील सरकारसाठी काम करतात. तालिबान या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा घरोघर जाऊन शोध घेत आहे. त्यानंतर माझा त्यांच्याशी संपर्क तुटला. अखेर ती महिला आजीच्या घरी जाण्यात यशस्वी ठरली. अन्य एक प्रशिक्षणार्थी पत्रकाराने मला भारतीय व्हिसा मिळवून देण्यासाठी एक एसआेएस संदेश पाठवला. त्यानंतर त्याच्या काकूने मला फोन केला. त्या थरथरत्या स्वरात म्हणाल्या, माझे पती सरकारी प्रकल्पासाठी काम करतात. मी अमेरिकेतील विद्यापीठात काम करते.

आम्ही भारतासाठी तिकीट खरेदी केले आणि व्हिसासाठी फाइल करण्यासाठी गेलो. परंतु राजदूत कार्यालय बंद झाले. आमची मदत करा. पुरुष पत्रकार, आरोग्य कार्यकर्ते अफगाण समाजात परिवर्तनासाठी सहायक व उत्साही होते. आपली उद्दिष्टे गाठण्यासाठी ते अथक प्रयत्न करत होते. परंतु अमेरिकेचे सैन्य देश सोडणार होते याची जाणीव आम्हाला होती. कोविड, अनिश्चित भवितव्य अशा चिंता मनात होत्या. परंतु सामान्य लोक संघर्ष करत वाटचाल करत होते. त्यांना कोणीही रोखू शकत नव्हते. परंतु तालिबानने सगळे बदलले. मैदान प्रांताचे रहिवासी एक व्यथित वडील म्हणाले, माझी मुले रात्रभर रडत होती. माझी आई खूप चिंतेत आहे. तिचा रक्तदाब वाढतोय. आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊ जाऊ शकत नाहीत. आैषधीही आणून देऊ शकत नाहीत. आता लोक हताश होऊन घरी परतू लागले आहेत. कारण त्यांना खूप प्रयत्न केल्यानंतरही कोणताही मार्ग दिसत नाही.

माजी मंत्र्यांवर पिझ्झा विकण्याची वेळ, जर्मनीत उदरनिर्वाह
एकेकाळी अफगाणिस्तानचे दूरसंचारमंत्री राहिलेले सय्यद अहमद शाह सआदत जर्मनीत एका सामान्य कामगारासारखे जीवन जगत आहेत. माजी मंत्री सआदत जर्मनीतील लेईपझिगमध्ये फूड डिलिव्हरी बॉयची नोकरी करत आहेत. पिझ्झा व इतर फूडची डिलिव्हरी करत आहेत. सआदत २०१८ पर्यंत अफगाण सरकारमध्ये मंत्रिपदावर होते. ते गेल्या वर्षी निवृत्त झाले आणि ते जर्मनीत गेले. आधी ते अफगाणिस्तानात राहत होते. परंतु पुरेसे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी करत आहेत. आता त्यांचा खर्च भागतो. ते आपल्या सायकलवर शहरात फिरतात.

बातम्या आणखी आहेत...