आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • From An All Rounder In Cricket To Getting Out On The Pitch Of Politics, Some Interesting Anecdotes From Imran's Life

इम्रान खान यांचा आजवरचा प्रवास फक्त 12 फोटोंमध्ये:राजकारणाच्या मैदानावरही शेवटच्या क्षणी षटकार मारत टिकवले सरकार

इस्लामाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात मोठे राजकीय नाट्य सुरू होते. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वातील सरकार विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. हा अविश्वास ठराव नॅश्नल असेंब्लीच्या उपसभापतींनी धूडकावून लावला आहे. अखेर क्रिकेटच्या खेळपट्टीवर पाकिस्तानचा हिरो ठरलेल्या इम्रान खान यांनी राजकारणातील मैदानावरही शेवटच्या क्षणी षटकार मारत सरकार वाचवण्यात यश मिळवलं. युती पक्षाव्यतिरिक्त इम्रानच्याच पक्षातील काही खासदारांनी त्यांची साथ सोडली होती. पण, इम्रान खान यांनी हार मानली नाही आणि अखेर परकीय कारस्थानांचा हवाला देत आज त्यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव संसदेत फेटाळण्यात आला. क्रिकेट जगतापासून राजकारणापर्यंतचा इम्रान खान यांचा प्रवास रंजक आहे. आपण फोटोच्या माध्यमातून त्यांच्या प्रवासाची झलक पाहूया.

इम्रान खान यांचा जन्म लाहोरच्या जमान पार्कमध्ये झाला.
इम्रान खान यांचा जन्म लाहोरच्या जमान पार्कमध्ये झाला.

इम्रान खान यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1952 ला लाहोरच्या जमान पार्कमध्ये झाला. इम्रान खान यांचे संगोपन चार बहिणींसोबत झाले. पश्तून कुटुंबात जन्मलेल्या इम्रानच्या कुटुंबात अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. ज्यात दोन मोठे चुलत भाऊ जावेद बुर्की आणि माजीद खान यांचा समावेश होता, जे पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते.

इम्रान खान यांनी पाकिस्तान आणि ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले.
इम्रान खान यांनी पाकिस्तान आणि ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले.

इम्रानने पाकिस्तान आणि ब्रिटनमधील मोठ्या शाळांमध्ये शिक्षण घेतले. यामध्ये वॉर्सेस्टरमधील रॉयल ग्रामर स्कूल आणि लाहोरमधील अॅचिसन ​​कॉलेज यांचा समावेश होता. खानने वयाच्या 13 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

लंडनमध्ये शिकत असताना इम्रान खान यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
लंडनमध्ये शिकत असताना इम्रान खान यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

1971 साली बर्मिंगहॅम येथे झालेल्या इंग्लिश मालिकेदरम्यान इम्रान वयाच्या 18 व्या वर्षी पाकिस्तानकडून खेळले होते. 1974 मध्ये इम्रान खान ऑक्सफर्ड विद्यापीठ क्रिकेट संघाचा कर्णधारही होते.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख झिया-उल-हक यांनी त्यांना पीएमएल पक्षात येण्यास सांगितले होते.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख झिया-उल-हक यांनी त्यांना पीएमएल पक्षात येण्यास सांगितले होते.

इम्रान हे क्रिकेट जगतातील पहिले पाकिस्तानचे अष्टपैलू खेळाडू आहेत. 1987 मध्ये, जेव्हा त्यांनी पाकिस्तानला भारतीय भूमीवर पहिली कसोटी मालिका जिंकून दिली होती, तेव्हा पाकिस्तानचा हुकूमशहा झिया-उल-हक यांनी त्यांना पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल) मध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. मात्र, इम्रान यांनी ही ऑफर फेटाळून लावली होती.

1992 मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर ट्रॉफीसोबत इम्रान खान.
1992 मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर ट्रॉफीसोबत इम्रान खान.

इम्रानच्या नेतृत्वाखाली 1992 मध्ये पाकिस्तानने पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर त्यानी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत खान यांनी 3,807 धावा केल्या आणि 362 विकेट घेतल्या आहेत. सामन्याच्या पहिल्या चेंडूवर भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्करला बाद करणाऱ्या मोजक्या गोलंदाजांपैकी इम्रान खान एक आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यावर इम्रान खान यांनी गावस्कर यांना शपथविधीसाठी निमंत्रणही दिले होते.

सुनिल गावस्कर आणि इम्रान खान
सुनिल गावस्कर आणि इम्रान खान

1994 मध्ये इम्रान खान यांनी पाकिस्तानातील लाहोर आणि मियांवली येथे शौकत खानम कॅन्सर हॉस्पिटल सुरू केले. कर्करोगाने निधन झालेल्या त्यांच्या आईला त्यांनी हे रुग्णालय समर्पित केले.

1992 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर इम्रान खान यांनी मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेतून कॅन्सर हॉस्पिटल बांधले.
1992 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर इम्रान खान यांनी मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेतून कॅन्सर हॉस्पिटल बांधले.

इम्रान खान यांनी 1996 मध्ये पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाची स्थापना केली. 22 वर्षे राजकारणात संघर्ष केल्यानंतर 18 ऑगस्ट 2018 रोजी त्यांनी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

2018 मध्ये, इम्रान खान पाकिस्तानचे 22 वे वझीर-ए-आझम बनले.
2018 मध्ये, इम्रान खान पाकिस्तानचे 22 वे वझीर-ए-आझम बनले.

इम्रान खान बनी गाला येथील त्यांच्या घरापासून इस्लामाबादमधील त्यांच्या कार्यालयापर्यंत हेलिकॉप्टरने सुमारे 15 किमी प्रवास करतात. 2018 मध्ये यावरून बराच गदारोळ झाला होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी हेलिकॉप्टरने 1 किमी प्रवास करण्यासाठी 1500 रुपयांहून अधिक खर्च येत असे.

इम्रान खान बनी गाला येथील त्यांच्या बंगल्यातून हेलिकॉप्टरने इस्लामाबादला जात असे.
इम्रान खान बनी गाला येथील त्यांच्या बंगल्यातून हेलिकॉप्टरने इस्लामाबादला जात असे.

ब्रिटनची राजकुमारी डायना आणि इम्रान खानची पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. 1995 मध्ये डायना या इमरानचे नातेवाईक डॉक्टर हसन खान यांच्यासोबतही रिलेशनशिपमध्ये होत्या. यादरम्यान त्यांनी अनेकवेळा पाकिस्तानला भेट दिली होती.

ब्रिटनची राजकुमारी डायना आणि इम्रान खान
ब्रिटनची राजकुमारी डायना आणि इम्रान खान

1996 मध्ये बॉथमने इम्रानच्या 'वर्णद्वेषी' टिप्पणीनंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. इम्रान यांच्यावर न्यायालयात असे अनेक गुन्हे दाखल आहेत. बदनामी, छळ, सरकारी सुविधांचा गैरवापर, ड्रग्ज घेणे, मुलीची ओळख लपवणे अशा अनेक प्रकरणांचा यात समावेश आहे.

इंग्लंडचा क्रिकेटपटू इयान बोथमला 'वर्णद्वेषी' म्हटल्याबद्दल इम्रानला कोर्टात खेचण्यात आलं होतं.
इंग्लंडचा क्रिकेटपटू इयान बोथमला 'वर्णद्वेषी' म्हटल्याबद्दल इम्रानला कोर्टात खेचण्यात आलं होतं.

इम्रान खानने 1995 मध्ये जेमिमा गोल्डस्मिथसोबत पहिले लग्न केले होते. त्यांना पहिल्या पत्नीपासून सुलेमान आणि कासिम ही दोन मुले आहेत. जेमिमा आणि इम्रान यांनी लग्नाच्या 9 वर्षानंतर घटस्फोट घेतला होता. पाकिस्तानशी जुळवून घेण्याचा आणि हे लग्न टिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण राजकारणामुळे मी तिला वेळ देऊ शकलो नाही, असे एका मुलाखतीत इम्रान खान म्हणाले होते.

इम्रान खान यांची दोन्ही मुले पहिली पत्नी जेमिमासोबत लंडनमध्ये राहतात.
इम्रान खान यांची दोन्ही मुले पहिली पत्नी जेमिमासोबत लंडनमध्ये राहतात.
बातम्या आणखी आहेत...