आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Froud Case Updates: A Man Not Goes For 15 Years, But His Salary Has Been Credited To His Account; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निष्काळजी:15 वर्षे नोकरीवर गेलाच नाही, तरीही खात्यात जमा होत राहिले वेतन, आतापर्यंत 5 कोटी अदा

लंडन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फसवणुकीचा गुन्हा, व्यवस्थापकांविरोधातही कारवाईला सुरुवात
  • इटलीच्या एका रुग्णालयात 2005 पासून काम करणे केले होते बंद

इटलीतील एका रुग्णालयात काम करणाऱ्या व्यक्तीला ‘गैरहजर राहणाऱ्यांचा राजा’ म्हटले जात आहे. तो कोणतीही नोटीस किंवा अर्ज न देता गेल्या १५ वर्षांपासून आपल्या कामावर येत नव्हता. आश्चर्याची बाब म्हणजे या १५ वर्षांत त्याला दरमहा वेतन मिळत होते. पगाराच्या दिवशी त्याच्या खात्यात पैसे जमा व्हायचे. चर्चेत आलेल्या या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. त्याने सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीत एवढी मोठी सुटी व वेतन घेण्याचा विक्रम केला आहे. या व्यक्तीला १५ वर्षात ५.३८ लाख युरो (सुमारे ४.८ कोटी रुपये) वेतन मिळाले.

या व्यक्तीचे वय ६७ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. १५ वर्षांनी या गोष्टीचा खुलासा झाल्यानंतर इटलीच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला. या व्यक्तीवर आता फसवणूक, खंडणी, कार्यालयाच्या दुरुपयोगाचे आरोप करण्यात आले आहेत, रुग्णालयाच्या सहा व्यवस्थापकांवरही कारवाई सुरू आहे. त्यांनी अनुपस्थित राहिल्यानंतरही कारवाई केली नाही. पोलिस चौकशीत आढळून आले की, आरोपीने २००५ मध्ये त्याच्याविरोधात अनुशासनात्मक अहवाल देणाऱ्या व्यवस्थापकाला धमकी दिली होती. नंतर व्यवस्थापक निवृत्त झाल्या व कर्मचारी गैरहजर राहू लागला. गैरहजर राहण्याच्या दुसऱ्या एका प्रकरणाच्या चौकशीच्या वेळी पोलिसांना हे समजले.

एचआर व व्यवस्थापकालाही नव्हती माहिती
पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीवेळी सांगितले की, एचआर विभाग व नव्या व्यवस्थापकालाही याबाबत काही माहिती मिळाली नाही. पोलिसांनुसार आरोपी कार्यालयात का येत नाही हे कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. गैरहजर असूनही त्याला वेतन मिळत होते. पोलिस अधिकाऱ्यांना संशय आहे की, या प्रकरणात रुग्णालयातील काही मोठ्या अधिकाऱ्यांचाही समावेश असेल. यामुळे पोलिस सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...