आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रातोरात कंगाल झाला हा अब्जाधीश:नेटवर्थमध्ये तब्बल 94 टक्क्यांची घट; अवघ्या  24 तासांत बुडाले 14.6 अब्ज डॉलर्स

वॉशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

FTXचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम बँकमन -फ्रायड रातोरात कंगाल झालेत. त्यांच्या नेटवर्थमध्ये एकाच दिवशी तब्बल 94 टक्क्यांची घट झाली आहे. ते सुमारे 15.2 अब्ज डॉलर्सचे मालक होते. पण आता त्यांच्याकडे केवळ 991.5 दशलक्ष डॉलर्स शिल्लक राहिलेत. ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, एखाद्या अब्जाधीश व्यक्तीच्या संपत्तीत प्रथमच एकाच दिवसात एवढी मोठी घट झाली आहे.

30 वर्षीय सॅम बँकमन-फ्रायड यांनी नुकतीच क्रिप्टो एक्सचेंज FTXची खरेदी प्रतिस्पर्धक कंपनी बिनांस करत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांना हा जोरदार धक्का बसला आहे.

क्रिप्टोकरंसीचे जगातील सर्वात मोठे व्यासपीठ असणाऱ्या बिनांसचे प्रमुख चँगपेंग झाओ म्हणाले की, त्यांनी एफटीएक्स खरेदी करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हे छोटे क्रिप्टो एक्सचेंज सध्या आर्थिक संकटात सापडले आहे. या सौद्याच्या घोषणेनंतर झाओ यांनी गुंतवणुकीचे 2 मंत्रही दिले.

वॉरेन बफेटशी तुलना

कॉइनडेस्क (Coindesk)नुसार, एफटीएक्स विक्री करण्याचे वृत्त येण्यापूर्वी सॅम बँकमन-फ्रायड यांच्याकडे एकूण 15.2 अब्ज डॉलर्सची संपत्ती होती. त्यात रातोरात 14.6 अब्ज डॉलर्सची घट जाली. 30 वर्षीय अब्जाधीश फ्रायड यांना यामुळे जोरदार झटका बसला आहे. सोशल मीडियावर त्यांना एसबीएफ (SBF)नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे गत ऑगस्ट महिन्यातच फॉर्च्युन मॅगझिनने सॅम बँकमन-फ्रायड यांचा भविष्यातील वॉरेन बफेट म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांच्या जिवनात हे वादळ आले आहे.

जर-तरच्या गोष्टी

टेक न्यूज संकेतस्थळ द इन्फॉर्मेशनने गुरुवारी सांगितले होते की, त्यांनी सिकोइया व अन्य व्हेंचर कॅपिटल फर्मद्वारे व्यस्थापित करण्यात येणाऱ्या निधीमध्ये 500 दशलक्ष डॉलर्सहून अधिकची गुंतवणूक केली होती. तसेच ते मीडिया स्टार्टअप सेमाफोरमधीलही एक महत्त्वाचे गुंतवणूदार होते. त्यामुळे या मालमत्ता अल्मेडामार्फत ठेवल्या गेल्या तर त्या त्यांना नुकसानीतून बाहेर काढता येऊ शकते.

या प्रकरणावर नजर असणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, त्यांच्या वाट्यासाठी यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनद्वारे बँकमन -फ्रायडची चौकशीही सुरू आहे.

कोण आहेत सॅम?

सॅम बँकमन -फ्रायड यांचे आई-वडील स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमध्ये प्रोफेसर आहेत. स्वतः फ्रायड यांचे शिक्षण विख्यात Massachusetts Institute of Technology (MIT)मध्ये झाले आहे. 2017 मध्ये क्रिप्टोकरंसीच्या जगात पाय ठेवण्यापूर्वी ते वॉल स्ट्रीटमध्ये ब्रोकर म्हणून काम करत होते.

बातम्या आणखी आहेत...