आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन वार्ता:चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह कम्युनिस्ट पार्टीतील ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. झेमिन ल्युकेमिया आजाराने ग्रस्त होते. यात त्यांचे अनेक अवयक निकामी झाल्यामुळे ३० नाेव्हेंबर रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. झेमिन यांची १९८९ नंतर तियानमेन चौक नरसंहारानंतर चीनच्या नेतृत्वासाठी निवडले होते. त्यांनी जवळपास एक दशक चीनवर शासन केले. त्यांच्या कार्यकाळात चीनमध्ये कोणतेही मोठे आंदोलन झाले नाही.

झेमिन यांच्या पार्थिवावर बाबाओशान क्रांतीकारी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. झेमिन यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी चीनच्या पीएलए सामान्य रुग्णालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

बातम्या आणखी आहेत...