आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मिरात जी-20 च्या बैठकीवर पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. हा काश्मीर मुद्द्यावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. काश्मीर मुद्द्यावर युएन चार्टरनुसार तोडगा निघायला हवा आणि जोपर्यंत हा तोडगा निघत नाही तोपर्यंत पाकिस्तान विरोध करत राहील असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारताने शुक्रवारी जी-20 चे इव्हेंट कॅलेंडर जारी केले होते. यानुसार, यूथ-20 ची बैठक श्रीनगर, लेह आणि लडाखमध्ये होईल. एप्रिल व मे महिन्यात ही बैठक होईल.
श्रीनगरमध्ये 22 ते 24 मे पर्यंत बैठक
पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनमधील वृत्तानुसार, जी-20 ची एक बैठक 22 ते 24 मेदरम्यान श्रीनगरमध्ये होईल. भारताकडे यावर्षीच्या जी-20 चे अध्यक्षपद आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानुसार, भारत केवळ स्वतःच्या समाधानासाठी अशा कृती करत आहे. काश्मीरशिवाय लेह आणि लडाखमध्येही भारताने जी-20 बैठकांचे नियोजन केले आहे.
वक्तव्यात पुढे म्हटले आहे की-काश्मीर दोन्ही देशांतील एक वादाचा मुद्दा आहे. म्हणून इथे होणाऱ्या बैठकांची आम्ही निंदा करतो. योग्य अर्थाने या बैठकी जगाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहेत. यात भारत यशस्वी होऊ शकणार नाही. भारत जी-20 सदस्यत्वाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने एका जबाबदार देशासारखे वागायला हवे.
काय आहे जी-20?
जी-20 मध्ये अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, जर्मनी, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपीयन युनियनचा समावेश आहे. जी-20 तील देशांचा जीडीपी जगातील एकूण जीडीपीच्या 85% आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.