आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गलवानवर मोठा खुलासा:चकमकीदरम्यान चीनचे 38 सैनिक नदीत वाहून गेले, मात्र त्यांनी केवळ 4 जणांच्या मृत्यूची दिली होती कबुली

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जून 2020 मध्ये, पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत 38 चीनी सैनिक ठार झाले होते. द क्लॅक्सन या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या तपास अहवालातून ही बाब समोर आली आहे. ही संख्या चीनने सांगितलेल्या संख्येपेक्षा 9 पट अधिक आहे. दीड वर्षांच्या संशोधनानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया संशोधकांची टीम तयार केली होती. ज्यांनी 'गलवान डीकोडेड' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला. अँथनी क्लानच्या नेतृत्वाखालील विशेष अहवालात असे म्हटले आहे की चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) चे अनेक सैनिक त्या रात्री गलवान नदीत वाहून गेले होते. या संशोधन अहवालाने ड्रॅगनचा सर्व प्रोपेगंडा ध्वस्त केला आहे.

चीनने तथ्यांमध्ये हेराफेरी केली
अहवालानुसार, चीनने या चकमकीत हेरफेर करण्यासाठी दोन वेगवेगळ्या घटनांचे मिश्रण केले होते. चीनने गलवानमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या कधीच सांगितली नाही, परंतु गेल्या वर्षी चकमकीत मारल्या गेलेल्या चार सैनिकांना पदक जाहीर केले. रिसर्चर्सने सांगितले की, 15-16 जूनच्या रात्री झीरो डिग्री तापमानात वाहणाऱ्या गलवान नदीमध्ये अनेक PLA सैनिक बुडून मृत झाले होते.

चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोच्या अनेक यूजर्शच्या ब्लॉगच्या आधारे मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, त्या रात्री 38 चीनी सैनिक नदीत वाहून गेले. नंतर चिनी अधिकाऱ्यांनी या सर्व सोशल मीडिया पोस्ट काढून टाकल्या. या 38 जणांमध्ये ज्युनियर सार्जेंट वांग झुओरान यांचाही समावेश होता, ज्यांना चीनने पदक जाहीर केले आहे.

तिबेटमधील पँगोंग दरीजवळही चकमक झाली होती
अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, एप्रिल 2020 च्या सुमारास, चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात बांधकाम कार्य तीव्र केले, परंतु 15 जून रोजी एका अस्थाई पुलावरून लढाई सुरू झाली. मे 2020 च्या सुरुवातीला तिबेटमधील पॅंगॉन्ग झीलजवळ भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये चकमक झाली होती. चीनचा सरकारी मीडिया या चकमक आणि त्यानंतरच्या घटनांना कव्हर करण्यात पूर्णपणे फेल राहिला होता. त्यांनी खूप तथ्ये लपवली होती आणि जगाला जे सांगितले त्या मनाने रचलेल्या कथा होत्या.

गलवान खोऱ्यात काय घडले होते
गेल्या वर्षी एप्रिल-मेमध्ये चीनने पूर्व लडाखच्या पुढच्या भागात सरावाच्या बहाण्याने सैन्य जमा केले होते. यानंतर अनेक ठिकाणी घुसखोरीच्या घटना घडल्या. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने या भागात तितक्याच संख्येने सैनिक तैनात केले. परिस्थिती इतकी बिघडली की 4 दशकांहून अधिक काळानंतर LAC वर गोळीबार झाला. दरम्यान, 15 जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते.

बातम्या आणखी आहेत...