आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Galwan Vally Deadly Clash; China Sent Martial Artists To India Border Before Latest News And Updates

धुमश्चक्रीआधी चिनी सैनिकांना दिले प्रशिक्षण:चिनी मीडियाचा दावा - गलवानमध्ये झडप होण्यापूर्वी चीनने आपल्या सैनिकांना अधिक चपळ करण्यासाठी मार्शल आर्टिस्ट पाठवले होते

बीजिंग2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • चीन नॅशनल डिफेन्स न्यूजनुसार - मार्शल आर्टिस्टमध्ये 5 मिलिशिया विभाग होते
  • सैनिकांना प्रशिक्षण देणाऱ्या टीममध्ये एव्हरेस्ट ऑलिम्पिक टॉर्च रिले टीमचे सदस्य होते

चीनने 15 जून रोजी गलवान हिसंक धुमश्चक्रीआधी आपल्या सैनिकांना ट्रेनिंग दिली होती. त्यांनी सीमेजवळ मार्शल आर्टिस्ट आणि तज्ज्ञ पर्वतारोहण पाठविले होते. यात तिबेटमधील मार्शल आर्ट क्लबमधील तरुणांचा समावेश होता. चीनच्या सरकारी मीडियाने आपल्या अहवालात असे म्हटले की, चिनी सैनिकांना चपळ व तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांनी पावले उचलली. 

तिबेटमध्ये दिले प्रशिक्षण

चीनचे अधिकृत सैन्य वृत्तपत्र 'चायना नॅशनल डिफेन्स न्यूज' च्या वृत्तानुसार, चीनने तिबेटची राजधानी ल्हासामध्ये पाच लष्करी विभाग तैनात केले होते. यामध्ये माउंट एव्हरेस्ट टॉर्च रिले टीमचे माजी सदस्य आणि मार्शल आर्ट क्लबमधील लढाऊंचा समावेश होता. माउंट एव्हरेस्ट टॉर्च रिले टीमचे सदस्य डोंगरांमध्ये काम करण्यात पटाईत असतात. तर मार्शल आर्टिस्ट धोकादायक सैनिक असतात. जवानांना जोशिले आणि बनवण्यासाठी आणि ट्रेंड करण्यासाठी तैनात होते. जवानांना चपळ आणि ट्रेंड करण्यासाठी यांना तैनात करण्यात आले होते. मिलिशिया विभाग अधिकृत सैन्य नसते. हे सेनेच्या मदतीसाठी असते. तिबेटची राजधानी ल्हासामध्ये शेकडो नवीन सैनिकांचे सीसीटीव्ही फुटेजही वर्तमानपत्रात दाखवले आहेत. 

चिनी मीडिया दाखवतीये आपला आडमुठेपणा 

तिबेट कमांडर वांग हायजियांग म्हणाले की, फाईट क्लबची भर घातल्याने सैनिकांची ताकद आणि तत्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता वाढेल. तथापि, ते केवळ सध्याच्या तणावामुळेच तैनात करण्यात आल्याचे अद्याप सांगितले नाही. गलवान संघर्ष झाल्यापासून चिनी मीडिया आपला आडमुठेपणा दाखवत आहे. मीडियात तिबेटमधील चिनी सैन्याचा मोठा सैनिकी सराव आक्रमक पद्धतीने दाखवला जात आहे.  चीनला हे देखील ठाऊक होते की, 1996 आणि 2005 च्या करारामुळे ते शस्त्रे वापरू शकत नव्हते. म्हणून त्याने आपल्या सैनिकांना मार्शल आर्टर्सद्वारे प्रशिक्षण दिले.

भारताने हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केली

चिनी लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर्स लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलवर (एलएसी) फिरत आहेत. चीनमधील हे उपक्रम एलएसीच्या 10 किमी क्षेत्रात सुरू आहेत. अशा परिस्थितीत भारतानेही आता पीपल्स लिबरेशन आर्मीला (पीएलए) त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी केली आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलएसीवर चीनच्या लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टरचा मागोवा घेण्यासाठी सैन्याने पूर्वेकडील लडाखमध्ये 'आकाश' अॅडव्हान्स डिफेन्स क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. यामुळे भारतीय लष्कराला चीनच्या प्रत्येक गोष्टीवर सहज नजर ठेवता येईल. अशा परिस्थितीत चिनी विमानाने एलएसी ओलांडली तर ते हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा त्वरित नष्ट करेल.

बातम्या आणखी आहेत...