आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुजाना एन्काउंटरची अखेरची 30 मिनिटे:गँगस्टरने 20 मिनिटे शेतात पळवली स्कॉर्पिओ, दोन्ही हातात पिस्तूल घेऊन STF वर गोळीबार

मेरठएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश STF ने गुरुवारी खूनाच्या 18 प्रकरणांत हवा असणाऱ्या गँगस्टर अनिल दुजानाचे एन्काउंटर केले. दुजाना गत 3 वर्षांपासून दिल्लीच्या तुरुंगात बंदिस्त होता. जामिनावर सुटल्यानंतर तो फरार होता. एसटीएफला गुरुवारी दुजानाचा ठावठिकाणा समजला. त्याने दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या हत्येची सुपारी घेतली होती. त्याचे नियोजन करण्यासाठी तो मुझफ्फरनगरला जात होता.

एसटीएफने दुजानाचा पाठलाग केला असता तो आपल्या स्कॉर्पिओसह एका शेतात शिरला. त्याने 20 मिनिटे शेतात गाडी पळवली. पण कार एका खांबाला धडकली अन् घात झाला. त्यानंतर दुजाना कारमधून बाहेर आला. त्याने दोन्ही हातात पिस्तूल घेऊन एसटीएफवर अंदाधंद गोळीबार सुरू केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत दुजानाच्या छातीत व डोक्यात गोळी लागली आणि तो खाली कोसळला.

एसटीएफला पाहताच दुजानाने स्कॉर्पिओ रस्त्यावरून शेतात नेली. त्याची कार एका खांबाला धडकली. त्यानंतर दुजानाने एसटीएफवर गोळीबार सुरू केला.
एसटीएफला पाहताच दुजानाने स्कॉर्पिओ रस्त्यावरून शेतात नेली. त्याची कार एका खांबाला धडकली. त्यानंतर दुजानाने एसटीएफवर गोळीबार सुरू केला.

अनिल दुजानाच्या एन्काउंटरच्या शेवटच्या 30 मिनिटांची कहाणी...

दुजानावर 18 खुनासह 62 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो टोळीने खून, दरोडे घालत असे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका एसटीएफ अधिकाऱ्याने सांगितले की, जामिनावर सुटल्यानंतर अनिल दुजाना गत 10 दिवसांपासून पश्चिम यूपीमध्ये फिरत असल्याची खबर मिळाली होती. अनिल दुजानाने मुझफ्फरनगरमध्ये कुणाला तरी ठार मारण्याची सुपारी घेतल्याची माहिती होती. जामिनावर सुटल्यानंतर तो केव्हाही मोठी घटना घडवू शकत होता. हे इनपूट मिळाल्यापासून एसटीएफ सातत्याने दुजानाच्या मागावर होती.

दुपारी 12: एसटीएफला दुजानाची माहिती मिळाली

हा चकमकीच्या घटनास्थळाचा फोटो आहे. फॉरेन्सिक टीमने येथे तपास केला.
हा चकमकीच्या घटनास्थळाचा फोटो आहे. फॉरेन्सिक टीमने येथे तपास केला.

एसटीएफला गुरुवारी दुपारी 12 वा. दुजाना बागपतहून मेरठमार्गे मुझफ्फरनगरला जात असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे दिल्लीत नोंदणीकृत कार होती. त्यानंतर मेरठ एसटीएफच्या 5 तुकड्या दुजानाला घेरण्यासाठी सज्ज झाल्या. त्या वेगवेगळ्या ठिकाणी तपास करत होत्या. जानी व भोला ढालवर एसटीएफच्या 3 तुकड्या तैनात करण्यात आल्या. बागपत रोडवर 2 पथके निगराणीसाठी ठेवण्यात आली. एसटीएफचे पथक सर्व भागात पसरले होते. दिल्लीचा नंबर असणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात होती.

अनिल दुजानाची गाडी 2.45 वा. ट्रेस झाली

दुजानाच याच स्कॉर्पिओतून जात होता. त्याने कारमधून बाहेर येत एसटीएफवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात कारच्या काचा अशा फुटल्या.
दुजानाच याच स्कॉर्पिओतून जात होता. त्याने कारमधून बाहेर येत एसटीएफवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात कारच्या काचा अशा फुटल्या.

2.45 च्या सुमारास STF ने भोला ढाल जवळ तपासणी करताना दुजानाची स्कॉर्पिओ ट्रेस केली. एसटीएफने अनिल दुजानाची कार रोखली. पण त्याने कार थांबवली नाही. त्याने आपली कार थेट एका शेताकडे वळवली. एसटीएफचे पथक त्याच्या मागे धावले. जवळपास 3 किमीपर्यंत शेतात पाठलाग झाला. तेवढ्यात समोर विजेचा खांब आला आणि दुजानाची कार त्याच्यावर आदळली. पुढचा रस्ताही बंद होता. त्यामुळे दुजाना पळून जाण्यासाठी कारबाहेर पडला.

दोन्ही हातांनी STF वर गोळीबार

याच ठिकाणी पोलिस आणि अनिल यांच्यात चकमक झाली.
याच ठिकाणी पोलिस आणि अनिल यांच्यात चकमक झाली.

गाडीतून उतरताना अनिल दुजानाने दोन्ही हातात पिस्तुल घेऊन एसटीएफवर गोळीबार केला. शेवटी एसटीएफला प्रत्युत्तर द्यावे लागले. एसटीएफला त्याला जिवंत पकडायचे होते. पण 10 मिनिटे दोन्ही बाजूंनी 15 ते 20 फैरी झाडण्यात आल्या. संपूर्ण परिसर गोळीबाराच्या आवाजाने दुमदुमून गेला. त्यात एसटीएफची एक गोळी दुजानाच्या छातीत व डोक्यात शिरली. त्यामुळे अनिल दुजाना जमिनीवर कोसळला. त्याच्या कमरेला गोळी लागल्याचेही बोलले जात आहे. त्याला एकूण किती गोळ्या लागल्या, हे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरूनच स्पष्ट होणार आहे.

दुजानाने व्यावसायिकाच्या हत्येची घेतली होती सुपारी

चकमकीत जखमी झाल्यानंतर पोलिसांनी दुजानाला रुग्णालयात हलवले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
चकमकीत जखमी झाल्यानंतर पोलिसांनी दुजानाला रुग्णालयात हलवले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

यासंबंधीच्या माहितीनुसार, दुजानाने मंडावली येथील एका व्यावसायिकाची हत्या करण्याची सुपारी घेतली होती. हे हत्याकांड घडवण्याच्या प्लॅनिंगसाठी तो मुझफ्फरनगरला जात होता. तिथे तो आपल्या हस्तकांना भेटणार होता. विशेष म्हणजे अनिल दुजाना तुरुंगातून बाहेर पडल्यापासून एसटीएफ त्याच्या मागावर होते. अनिल दुजाना हा जयचंद प्रधान हत्या प्रकरणातील साक्षीदार पत्नी संगीता हिला वारंवार धमकावत होता. गत आठवड्यातच त्याच्यावर या प्रकरणी 2 गुन्हे दाखल झाले होते.

अनिल दुजानाची 10 दिवसांपूर्वी दिल्लीतील एका तुरुंगातून जामिनावर सुटका झाली होती. तेव्हापासून तो एसटीएफच्या रडारवर होता. एसटीएफ सातत्याने त्याच्यावर नजर ठेवून होती. त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. तुरुंगातून सुटल्यानंतर तो पुन्हा आपली गँग बनवण्याच्या तयारीत होता. तशी खबर एसटीएफला मिळाली होती. यासंबंधी त्याने पश्चिम उत्तर प्रदेशातील काही जणांची भेटही घेतली होती.

दुजाना एन्काउंटरची खालील बातमी वाचा...

गँगस्टर अनिल दुजाना एन्काउंटरमध्ये ठार:STF ने मेरठमध्ये केला खात्मा, अनेक राज्यांमध्ये 60 हून अधिक गुन्हे होते दाखल

यूपी एसटीएफने गुरुवारी मेरठमध्ये गँगस्टर अनिल दुजाना (36) याला एन्काउंटरमध्ये ठार केले. तो नोएडातील बादलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दुजाना गावचा रहिवासी होता. 3 वर्षे अयोध्या तुरुंगात बंद होता. काही काळापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली होती. तेव्हापासून तो फरार होता. दुजानावर 18 खुनांसह 62 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो टोळी तयार करून खून, दरोडे घालत असे. यूपी एसटीएफने गेल्या 6 वर्षांत दुजानासह 184 एन्काउंटर केले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी...