आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Generally Leadership Qualities In Older Siblings, Interest In Research In Younger Children | Marathi News

नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधनात दावा:सामान्यपणे मोठ्या भावंडांत नेतृत्वगुण, धाकट्या मुलांना संशोधनात रस

बोस्टन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंबातील मोठ्या भावंडांत नेहमीच आत्मविश्वास व नेतृत्वगुण असतो. धाकट्या बहीण-भावांना मात्र संशोधन, साहसी जीवन जगण्यात रस असतो. नॉर्थईस्टर्न विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या प्रो. लॉरी क्राॅमर यांनी जन्माचा क्रम व त्याचा जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेण्यासाठी एक संशोधन केले. जन्माचा क्रम तुमच्या नेतृत्वगुणांवर परिणाम करू शकतो, असे या संशोधनात दिसून आले. परंतु धाकट्या आणि थोरल्या भावंडांमधील गुण वेगवेगळे असतात. क्रॉमर म्हणाल्या, कुटुंबात मोठ्या बहीण किंवा भावामध्ये नेतृत्वगुण जास्त प्रमाणात असतात. ते चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकतात. परंतु या गोष्टी कुटुंबातील वातावरणावर अवलंबून असतात. कुटुंबातील सर्वात धाकटी मुले संशोधनात रमतात. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज कुटुंबातील सर्वात धाकटे आहेत.

कुटुंबातील मधली मुले समन्वयक
कुटुंबातील जन्मक्रमात असलेली मधली मुले सामान्यपणे आई-वडिलांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी धडपडतात. स्पर्धाही करतात. मधली मुले चांगले समन्वयक, संवादक होतात. कारण कुटुंबाकडून कानाडोळा केला जात असल्याने त्यांना स्वत:ला प्रभावी पद्धतीने व्यक्त करता येते. ते इतरांशी चांगल्या प्रकारे संबंध ठेवतात. त्यांना इतरांना मदत करायलाही आवडते. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जन्मक्रमात मधले आहेत. त्यांच्या विचारांचे कौतुक केले जाते. त्याचबरोबर संवादविषयक धोरणांसाठीही त्यांचे कौतुक होते.

बातम्या आणखी आहेत...