आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकन देशात नरसंहार:इथोपियामध्ये अमहारा जमातीच्या 230 हून अधिक जणांची कत्तल

इथोपिया10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आफ्रिकन देश इथोपियामध्ये हत्याकांडाची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील ओरोमिया परिसरात रविवारी रात्री अमहारा जमातीच्या सुमारे 250 लोकांची हत्या करण्यात आली. हा हल्ला देशातील ओरोमिया गावात झाला. ओरोमो लिबरेशन आर्मी (OLA) या बंडखोर गटाने हे घृणास्पद कृत्य केले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इथोपियातील जातीय तणावाची गेल्या काही वर्षांतील ही सर्वात मोठी रक्तरंजित घटना आहे.

ओएलएच्या प्रवक्त्याने हे आरोप फेटाळून लावले
हल्ल्यातून वाचलेल्यांपैकी काहींनी या हल्ल्यासाठी ओरोमो लिबरेशन आर्मी (OLA) ला जबाबदार धरले आहे. एका निवेदनात, ओरोमिया प्रादेशिक सरकारने देखील OLA वर दोषारोप केला आणि म्हटले की OLA ने (संघीय) सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या ऑपरेशनला विरोध करण्यासाठी हा हल्ला केला. मात्र, ओएलएचे प्रवक्ते ओडा तारीबी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी या घटनेसाठी लष्कर आणि स्थानिक मिलिशियाला जबाबदार धरले. ज्या भागात हल्ला झाला त्या भागात आमचे सैनिक कधीच गेले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

मी स्वतः 230 मृतदेह मोजले: सईद ताहिर
स्थानिक रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शी अब्दुल सईद ताहिर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, 'मी स्वतः सुमारे 230 मृतदेह मोजले आहेत. माझ्या आयुष्यातील ही सर्वात वेदनादायक घटना आहे, जिथे शेकडो लोकांची निर्घृण हत्या झाली. सध्या आम्ही त्यांचे मृतदेह सामूहिक कबरीत दफन करत आहोत आणि यावरून मृतांचा आकडा कळला. संख्या आणखी जास्त असू शकते.

अमहारा समाजाचे लोक 30 वर्षांपूर्वी येथे स्थायिक झाले होते, आणखी एक प्रत्यक्षदर्शी, शंबल सांगतात की, सामूहिक कत्तलीच्या आणखी घटनांच्या भीतीने अमहारा समाजाचे लोक आता त्यांची दुसरी जागा शोधत आहेत. ते म्हणाले की, आदिम अमहारा समाजातील लोक सुमारे ३० वर्षांपूर्वी पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत येथे स्थायिक झाले होते, मात्र आता त्यांची कोंबड्यांसारखी कत्तल केली जात आहे.

इथोपियाला अनेक प्रदेशांमध्ये व्यापक वांशिक तणावाचा सामना करावा लागत आहे. जमातींमधील तणावाची कारणे ऐतिहासिक आणि राजकीय आहेत. इथोपियाच्या सुमारे 110 दशलक्ष लोकसंख्येमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वांशिक गट असलेल्या अमहारा समुदायाला आता लक्ष्य केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...