आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अमेरिका:140 शहरांत कृष्णवर्णीयांचे युद्ध, आधी हिंसाचार, आता शांततामय रॅलीच्या मार्गावर

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • संवेदना | मुलीने विचारले- गोळी माराल, पोलिस म्हणाला- संरक्षण करणार
Advertisement
Advertisement

अमेरिकेत वंशवादाविरोधातील आंदोलन सुरूच आहे. अमेरिकी-आफ्रिकी कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडचा पोलिस अत्याचारात २५ मे रोजी मृत्यू झाला. तेव्हापासून आतापर्यंत २१ राज्यांतील १४० शहरांमध्ये आंदोलने झाली. सुरुवातीला ही आंदोलने हिंसक होती. आता वॉशिंग्टन, न्यूयॉर्क सारख्या शहरांत शांततेने रॅली काढली जात आहे. वॉशिंग्टनमध्ये हजारो आंदोलक ऊन आणि उकाड्यातच कॅपिटाॅल, नॅशनल मॉल आणि परिसरात जमले. त्यांनी पोलिसांनी गळा पकडण्यावर बंदी घालायची मागणी केली. तसेच, पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर कॅमेरा लावण्याची मागणी केेली. वॉशिंग्टनच्या रॅलीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले, अपेक्षेपेक्षा कमी गर्दी झाली. अनेकांनी व्हाइट हाउसकडे कूच केले. ट्रम्प यांच्या गोल्फ रिसॉर्टच्या बाहेरही आंदोलक जमले. 

न्यूयॉकमध्ये श्वेत आंदोलकांनी कृष्णवर्णीयांच्या समर्थनार्थ फलक घेतले होते. नॉर्थ कॅरोलाइनात लोक फ्लॉयडचा मृतदेह असलेले सोनेरी ताबूत बघण्यासाठी अनेक तास थांबले. तिकडे सिएटलमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगड, बाटल्या, स्फोटके फेकली. यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांवर मिरचीचा स्प्रे केला. फ्लॉयडचा मृतदेह ह्यूस्टनला नेण्यात येईल. आधी ते तेथे रहायचे. दरम्यान, वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल मार्क मिले यांनी प्रतिनिधी सभेच्या नॅन्सी पेलोसी यांच्याशी चर्चा केली.

संवेदना | मुलीने विचारले- गोळी माराल, पोलिस म्हणाला- संरक्षण करणार

ह्यूस्टनमध्ये आंदोलकांमध्ये उभ्या असलेली ५ वर्षांची मुलगी रडत होती. एका पोलिस कर्मचाऱ्याने तिला शांत करायचा प्रयत्न केला. यावर मुलगी म्हणाली, तुम्ही आम्हाला गोळी माराल का? यावर पोलिस कर्मचाऱ्याने मुलीला कवेत घेत सांगितले, ते त्यांच्या सुरक्षेसाठी आहेत. तुमचे काही नुकसान होणार नाही. या घटनेचा व्हिडिओ समाेर आला आहे.

जग : दहा देशांत आंदोलने, इंग्लंडमध्ये १४ पोलिस जखमी

वंशवादाविरोधात ऑस्ट्रेलिया, जपान, फ्रान्स, इंग्लंडमध्ये आंदोलने झाली. इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये हिंसक आंदोलनात १४ पोलिस अधिकारी जखमी झाले. आंदोलकांनी फलकांवर लिहिले होते, कोरोनापेक्षा मोठा विषाणू वंशवाद आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी, मेलबॉर्न, फ्रान्सच्या पॅरिस आणि जपानच्या टोकियोतही आंदोलन करण्यात आले.

कर्तव्य| आंदोलनामुळे कचरा, युवकाने केला साफ

बफेलो शहरात आंदोलकांनी बॉम्ब आणि इतर वस्तू फेकल्या. सामानही जाळले. यामुळे रस्त्यांवर कचरा झाला. हा कचरा एक युवक अँटोनियो ग्विन ज्युनिअरने सलग १० तासांत साफ केला. ग्विकच्या या कृत्याचे स्थानिकांनी कौतुक केले. लोकांनी त्याला एक कार भेट दिली. एका महाविद्यालयाने ग्विनला शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे.

Advertisement
0