आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंद गती:जर्मनी व फ्रान्स पहिल्या तिमाहीत 12 टक्के लोकांना टोचणार लस

पॅरिस18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बहुतांश देशांत लक्ष्यापेक्षा मंद सुरू आहे लसीकरण मोहीम

कोरोनापासून सुटका करण्यासाठी अनेक देशांनी लसीकरणास सुरुवात केली आहे. मात्र, सध्या बहुतांश देशांत त्याचा वेग अपेक्षा आणि लक्ष्यापेक्षा खूप कमी आहे. जगभरातील लसीकरणाच्या शासकीय आकडेवारीवर नजर ठेवणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अमेरिकेची २०२१च्या पहिल्या तिमाहीत सुमारे ३० टक्के लोकांना लस द्यायची योजना आहे. मात्र, तेथे आतापर्यंत केवळ १.४६ टक्के लोकांनाच लस देण्यात आली आहे. जर्मनी आणि फ्रान्सने मार्चपर्यंत १२-१२ टक्के लोकांना लस द्यायचे म्हटले आहे. मात्र, या देशांना अद्याप १ टक्काही आकडा गाठता आलेला नाही. इंग्लंडमध्ये डिसेंबरअखेरपर्यंत केवळ १.३९ टक्के लोकांना लस टोचली गेली आहे.

अमेरिकेत आतापर्यंत २१ लाख मुलेही झाली बाधित
कोरोनाच्या सुरुवातीला वाटले की, मुलांना लवकर कोरोनाचा संसर्ग होत नाही. मात्र, अमेरिकेची आकडेवारी हैराण करणारी आहे. तेथे आतापर्यंत २१.३ लाख मुले बाधित झाली आहेत. अमेरिकन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्सच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार मागील एका आठवड्यातच तेथे १.२८ लाख मुले बाधित झाली आहेत.

ब्रिटन एका दिवसात ६२ हजार रुग्ण, १०४१ मृत्यू
कोरोनाच्या लसीला मंजुरी देणाऱ्या इंग्लंडमध्ये महामारी आणखी विक्राळ रूप धारण करत आहे. बुधवारी तेथे एका दिवसात संसर्गाची ६२३२२ प्रकरणे समोर आली, तर १०४१ जणांचा मृत्यू झाला. बुधवारी इंग्लंडप्रमाणेच अमेरिका (४१००), ब्राझील (१२६६), मेक्सिको (१०६५), जर्मनीतही (१०१९) एक हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. भारतात २२१ जणांचा मृत्यू झाला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser