आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीच्या चर्चमध्ये गोळीबार; 7 ठार, अनेक जखमी:10 मिनिटे अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोर ठार झाल्याची शक्यता

हॅम्बर्ग19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या हॅम्बर्गमध्ये गुरुवारी रात्री उशिरा चर्चमध्ये गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली. ग्रोस बोरस्टेल भागातील एका चर्चच्या यहोवा व्हिटनेस किंगडम हॉलमध्ये ही घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी अद्याप मृतांच्या संख्येला दुजोरा दिला नसला तरी 7 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. अनेक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. तसेच त्याने ही घटना का घडवली हे कळू शकलेले नाही. हॅम्बर्ग पोलिसांनी ट्विट केले- या गोळीबारात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. आम्ही मोठ्या संख्येने सुरक्षा दलांसह घटनास्थळी आहोत. हल्लेखोराने सुमारे 10 मिनिटे गोळीबार सुरूच ठेवला. मात्र, हल्लेखोर एक होता की एकापेक्षा जास्त हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चर्चभोवती घेराबंदी
सीसीटीव्ही स्कॅन करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. चर्चच्या आजूबाजूच्या रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली असून, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकांना गोळ्या लागल्या आहेत.

पोलिस प्रवक्त्याने सांगितले- ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा होत्या. दोन प्रत्यक्षदर्शींनी एन-टीव्ही टेलिव्हिजनला सांगितले की त्यांनी गोळ्यांचा आवाज ऐकला. 15 मिनिटांनी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली.

बातम्या आणखी आहेत...