आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजर्मनीमध्ये सत्तापालटाचा दहशतवादी कट रचल्याच्या आरोपावरून 25 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी सकाळी सुमारे 3 हजार पोलिस कर्मचाऱ्यांनी जर्मनीतील 16 पैकी 11 राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली. यामध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'रीच्सबर्गर'शी संबंधित लोकांना अटक करण्यात आली.
दहशतवादी कटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्यांमध्ये 72 वर्षीय निवृत्त लष्करी कमांडर आणि उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे माजी खासदार यांचाही समावेश आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 25 जणांपैकी 22 जण जर्मनीचे नागरिक असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. उर्वरित 3 लोकांपैकी एक रशियन महिलादेखील आहे, जी या लोकांना समर्थन देत होती.
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराच्या बरॅकचीही झडती
जर्मनीच्या स्थानिक प्रसारमाध्यमांच्या मते, ज्या ठिकाणी शोधमोहीम राबवली गेली, त्या ठिकाणी जर्मनीच्या विशेष दल केएसकेच्या बरॅक्सही आहेत. या युनिटच्या काही सैनिकांची याआधीही अति उजव्या संघटनांशी संबंध असल्याबद्दल चौकशी करण्यात आली होती.
जर्मन मीडियाच्या मते, संपूर्ण गटाचा नेता 71 वर्षीय हाइनरिक आहे. जो पूर्व जर्मनीच्या राजघराण्याचा वंशज आहे. यासोबतच जर्मनीच्या पॅराट्रूपर बटालियनचे सीनियर फिल्ड ऑफिसर रुजर वॉन पी हाही त्याचा साथीदार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गतवर्षी स्थापन झाली दहशतवादी संघटना
रुडगर पी. वॉन आणि हाइनरिक यांनी गतवर्षी त्यांची संघटना स्थापन केली होती. जर्मनीचे विद्यमान सरकार पाडून स्वतःचे सरकार स्थापन करणे हे त्यांचे ध्येय होते. या गटातील सदस्यांनी सत्तापालटानंतरच्या सरकारसाठी मंत्र्यांची निवड करण्यास सुरुवात केली होती. यासाठी 58 वर्षीय माजी खासदार बिर्गिट मलसॅक यांची कायदा मंत्री म्हणून निवड करण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.