आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनी कुशल स्थलांतरीतांच्या शोधात आहे. जर्मन सरकारने देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या कुशल व्यावसायिकांसाठी आपले दरवाजे खुले करण्याची तयारी केली आहे. या संदर्भात नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात भारतासह अन्य देशांतील कुशल कामगारांच्या स्थलांतरीत नियमांत सुधारणेचा मसुदा तयार केला आहे. वृत्तानुसार, मसुद्यात स्थलांतरीतांना नागरिकत्व देण्यासाठी जर्मनीत किमान ८ वर्षाच्या निवासाची अट कमी करून ५ वर्षे केली आहे. व्हिसा आणि नागरिकत्व नियमांतील सुधारणेसाठी नवीन स्थलांतरीत उत्साहित आहेत.
जर्मन लॉजिस्टिक कंपनी डीएचएलमध्ये ४ वर्षांपासून कार्यरत सत्या एस. म्हणाल्या, मी या मसुद्याबाबत उत्साहित आहे. मी येथे भाषा शिकणे आणि पदवी घेतल्यानंतर जर्मन नागरिकत्व घेऊ इच्छिते. मला आशा आहे की, आता हे स्वप्न लवकरच वास्तवात येईल. इन्स्टिट्यूट फॉर एम्प्लॉयमेंट रिसर्चनुसार, जर्मनीला दरवर्षी कमीत कमी ४ लाख कुशल व्यावसायिकांची गरज आहे. जर्मनीत गेल्या वर्षी १९ लाख लोक अन्य देशांतून आले होते. यापैकी १६ लाख युरोपीय संघाबाहेरील देशांचे होते. म्हणजे, सुमारे ३ लाख लोक युरोपबाहेर आले. यात पहिल्या क्रमांकावर भारताचे लोक होते. नवा कायदा जर्मनीत दुहेरी नागरिकत्व सुलभ करतो. अशात आयटी कुशल भारतीयांसाठी चांगली संधी असेल.जर्मनीला डिजिटलीकरणची गरज आहे. यामुळे संधी आहेत.
भारतीयांना जास्त संधी {भारताच्या आयटी व्यावसायिकांना जर्मनीत येण्याची संधी दिली जाते. {अनेक जर्मन कंपन्या आधीपासून भारताकडून कामाचे आऊटसोर्सिंग करते. {डेटा कायद्यामुळे भारतीयांना जर्मनीत नोकरी देणे मजबुरी आहे. {आयआयटी खरगपूर, मुंबई, दिल्लीची पदवी, जर्मन पदवीसमान मान्य.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.