आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजर्मनीत पहिली महिला चान्सलर अँगेला मर्केल यांचे युग संपले असले तरी जगातील चाैथी माेठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांच्या हाती आहे. पहिल्यांदाच परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्रिपदाची सूत्रे महिलांकडे आहेत. आेल्फा स्काेल्ज यांच्या मंत्रिमंडळात एकूण १६ मंत्री आहेत. त्यात ८ पुरुष व ८ महिला आहेत.
- सुमारे ८.३२ काेटी लाेकसंख्येच्या जर्मनीत ४.२१ काेटी महिला आहेत. अँगेला मर्केल जर्मनीत सलग चारवेळा चान्सलरपदी निवडून आल्या आहेत. सत्ताकाळात त्यांनी मातृत्व रजेचा कालावधी, डे-केअर इत्यादी संबंधी कायदे मंजूर केले. अर्धवेळ काम करणाऱ्या महिलांना देखील लाभ झाला.
- जर्मनीचे नवे चान्सलर आेल्फा माजी चान्सलर मर्केल सरकारमध्ये व्हाइस चान्सलर हाेते. - साेशल डेमाेक्रॅटिकच्या विजयात पक्षाचे नेतृत्व करणारे आेल्फा यांनी आधीच मंत्रिमंडळात समान हक्काचे आश्वासन दिले हाेते.
..कारण देशाच्या संरक्षणाची धुरा महिलांकडे
- ५६ वर्षीय क्रिस्टिन यापूर्वीही दाेन वेळा मंत्री राहिल्या आहेत. १९६२ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी साेशल डेमाेक्रॅटिक पक्षात सामील झाल्या.
- ५१ वर्षीय नॅन्सी यांनी १८ व्या वर्षीच डेमाेक्रॅॅटिक पार्टीत प्रवेश केला हाेता. जर्मनीतील संसदेच्या अनेक समित्यांवर सदस्य राहिल्या - ४१ वर्षीय एना यांना ग्रीन पार्टीने २०२१ निवडणुकीत चान्सलर पदासाठी उमेदवारी दिली हाेती. त्या १६ वर्षांपासून राजकारणात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.