आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हिटलरशाहीचे प्रतीक असलेल्या ‘चर्च बेल्स’ विकताेय जर्मनी; याच घंटांपासून तयार होत होत्या बंदुका-गोळ्या

बर्लिन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुसऱ्या महायुद्धादरम्यान युरोपमध्ये हिटलरच्या नेतृत्वाखाली जर्मन सेना जिथे पोहोचली तेथील चर्चवरील घंटा उतरवण्यात अाल्या. या पितळी घंटा वितळवून बंदुका आणि गोळ्या बनवल्या जात. शेकडो ते हजारो टन वजनाच्या सुमारे दीड लाख घंटा जर्मनीने वितळवल्या, परंतु सुमारे २५ हजार वाचल्या. जर्मनी आता या चर्च बेल्स जगभर विकत आहे. त्याचे सर्वात मोठे खरेदीदार असे देश आहेत, जेथे ख्रिश्चन धर्म वेगाने पसरत आहे. त्यामध्ये भारतासह आफ्रिकेतील देश आघाडीवर आहेत. यातील काही घंटा जर्मनीतून चर्चनी आधीच ताब्यात घेतल्या. गेल्या वर्षी येथून पोलंडमधील स्लावेसी या गावातील चर्चमध्ये घंटा पाठवण्यात आल्या. दक्षिण-पश्चिम पोलंडमधील रॅडोसजॉवी शहरातील धर्मगुरू ग्रेगोर्झ सॉन्क म्हणतात, “मला जर्मनीकडून एक पत्र मिळाले आहे.” चर्चची घंटा परत करताे अाहाेत, असे त्यात म्हटले अाहे. त्यामुळे मला अत्यानंद झाला. धार्मिक वस्तू ऑनलाइन विकणाऱ्या ग्लॉकेनबार्सचे सहसंस्थापक मॅथियास ब्रॉन म्हणतात, आम्ही जगभरात चर्चबेल विकत आहोत. किंमत त्यांच्या वजनावर ठरतेे. दर २४०० ते ३२०० रुपये किलो आहेत. त्यांचे वजन काही किलोपासून अनेक टनांपर्यंत असते. ख्रिस्ती धर्माचा प्रसार वेगाने हाेणाऱ्या देशांतून सर्वाधिक मागणी अाहे. त्यात भारतासह अाफ्रिका खंडातील बहुतांश देश आहेत. जगात दूरवरील अनेक चर्च धार्मिक वस्तू अाॅनलाइन खरेदी करतात. ज्या देशाने अनेक दशकांपूर्वी, शांततेचे प्रतीक असलेल्या चर्च बेल संपूर्ण युरोपमधून लुटल्या व हिंसाचारासाठी त्यापासून बंदुका आणि गोळ्या निर्माण केल्या ताे आता उर्वरित घंटा संपूर्ण जगाला परत करताे आहे.

हिटलरच्या सैन्याने युरोपामधील अनेक चर्चमधून पावणेदाेन लाख घंटा उतरवल्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शस्त्रे आणि गोळ्या बनवण्यासाठी पितळाचा तुटवडा होता. अशा स्थितीत हिटलरच्या सैन्याने युरोपातील चर्चमधून सुमारे पावणेदाेन लाख घंटा काढून घेतल्या. या घंटा किंवा चर्चबेल हजारो टन पितळापासून तयार केल्या जात. या वजनामुळेच त्यांचा आवाज दूरपर्यंत पोहोचू शकत असे.

बातम्या आणखी आहेत...