आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Germany : Testing Kit Made Before First Patient Arrived; Austria: Lock Down, Mobile Testing Saves The Situation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धडा:जर्मनी : पहिला रुग्ण येण्यापूर्वीच टेस्टिंग किट केले हाेते तयार; ऑस्ट्रिया : लाॅकडाऊन, माेबाइल टेस्टिंगमुळे परिस्थिती सावरली

बर्लिनएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
ड्रेस्डनच्या हाॅटेल व्यावसायिकाने समस्या लक्षात घेत खुर्च्यांना मुख्य चाैकात ठेवले. - Divya Marathi
ड्रेस्डनच्या हाॅटेल व्यावसायिकाने समस्या लक्षात घेत खुर्च्यांना मुख्य चाैकात ठेवले.
  • कशा प्रकारे काेराेनाचे संकट लक्षात घेतले? तयारी, राेखले कसे? युराेपीय देशांकडून हे शिकण्यासारखे

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात युराेप काेराेनाचे नवे केंद्र बनत चालले हाेते. चीनएेेवजी जगाचे लक्ष युराेपवर केंद्रित झाले हाेते. पुढच्या काही दिवसांत इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटनसारख्या देशातील वाढत्या संसर्गाने ते सिद्धही झाले. त्याच वेळी जर्मन चान्सलर अँगेला मर्केल यांचे एक वक्तव्य जारी झाले हाेते. त्यामुळे लाेकांची चिंता वाढली हाेती. जर्मनीची ७० टक्के लाेकसंख्या बाधित हाेऊ शकते, असे बिनधास्त सांगून मर्केल स्वत: क्वाॅरंटाइन झाल्या हाेत्या. त्यामुळे जर्मनीची स्थिती इटली किंवा स्पेनसारखी हाेईल, असे वाटले हाेते. परंतु एक महिन्यानंतर इटली, स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये दरराेज शेकडाे लाेकांचे प्राण जात राहिले. जर्मनीची स्थिती मात्र युराेपीय देशांत तुलनेने चांगली आहे.  देशात १४ हजार लाेक बाधित असून ३ हजार ८६८ जणांचा मृृत्यू झाला आहे. 

त्यामागे जर्मनीची दूरदृष्टी म्हणावी लागेल. जर्मनीत जानेवारीपासूनच परीक्षण करण्याची तयारी सुरू झाली हाेती. त्यामुळे टेस्ट किट आधीच बनवले हाेते. पहिला रुग्ण फेब्रुवारीत आढळला हाेता. परंतु त्याच्या आधीच देशभरात टेस्ट किट पाेहाेचवण्यात आले हाेते. परिणामी दक्षिण काेरियासारखी अनावश्यक तपासणी झाली नाही. उलट याेग्य वेळी चाचणी करून लाेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक शहरांत तर टेस्टिंगसाठी टॅक्सीदेखील सुरू करण्यात आल्या. या टॅक्सी लाॅकडाऊनच्या काळात घराेघर जाऊन टेस्ट करून घेत हाेत्या. म्हणूनच वेळेवर उपचार घेण्यात सुलभताही आली. कुणालाही लक्षणे आढळून आल्यास त्याने रुग्णालयात भरती हाेण्याची गरज नाही. तपासणीपासून त्याच्या अहवालापर्यंतची सर्व कामे घरबसल्या हाेतील, असा स्पष्ट संदेश आराेग्य अधिकाऱ्यांनी सामान्यांपर्यंत पाेहाेचवला हाेता. त्यातून उपचाराच्या एकूण प्रक्रियेत सहजता येऊ शकली. राॅबर्ट काॅख इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष लाेथर व्हीलर म्हणाले, जर्मनीने टेस्टिंगबराेबरच ट्रॅकिंगलाही तितकेच महत्त्व दिले. त्याशिवाय जर्मनीने संकटाचा अदमास घेत याेग्य वेळी कठाेर पावले उचलली. सीमाबंदी, साेशल डिस्टन्सिंगचा निर्णय महत्त्वाचा आहे. लाेकांनी चान्सलर मर्केल यांना पाठिंबा दिला. त्यामुळेच देशात पूर्ण लाॅकडाऊन न हाेताही लाेकांनी निर्बंध पाळले.

४ मेपासून लाॅकडाऊन मागे शक्य, नियमांचे पालन सुरूच

जर्मनीने लाॅकडाऊनमधून लवकरच बाहेर पडण्याची तयारी केली आहे. ३० एप्रिलला एक आढावा घेतला जाईल. त्यानंतर ४ मेपासून शाळा सुरू हाेतील. डे केअर सेंटर, धार्मिक कार्यक्रम, रेस्तराँ, सिनेमा ३१ आॅगस्टपर्यंत बंद राहतील. कार्यालयात किमान दीड मीटरचे अंतर ठेवले पाहिजे. त्याशिवाय ७५०० कंपन्यांनी शाॅर्ट टर्म वर्क सुरू करण्यास मंजुरीची मागणी केली आहे. त्यावरही विचार केला जात आहे. 

  • ऑस्ट्रिया : लाॅकडाऊन, माेबाइल टेस्टिंगमुळे परिस्थिती सावरली

आणीबाणीसाठी बनवले फील्ड हाॅस्पिटल, बेड रुग्णाच्या प्रतीक्षेत 

व्हिएन्ना आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाच्या उत्तरेत सुरू झालेल्या नवीन रुग्णालयांतील पार्किंग, वाॅर्ड रिकामे आहेत. काचेच्या भिंतीमधून काही आराेग्य कर्मचारी तेवढे दिसतात. येथे सध्या व्हिजिटर्सला परवानगी नाही. इटली व स्पेन सारखे येथील रुग्णालये काेराेना रुग्णांच्या आेझ्याने दबलेले दिसत नाहीत. परिस्थिती नियंत्रणात आहे. देशात सुमारे १ हजार काेराेना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २५० आयसीयूमध्ये आहेत. लवकरच शेकडाे खाटांचे फील्ड हाॅस्पीटलही रिकामे हाेतील. एक तृतीयांश आयसीयू खाटांची देखील अशीच स्थिती आहे. देशाच्या आराेग्य मंत्रालयाच्या सूत्रांच्या मते २४ तासांत रुग्ण येण्याचे प्रमाण १२२ टक्क्यांनी घटले आहे. २६ मार्चला एकूण ९६६ रुग्ण आढळले हाेते. थाेडक्यात परिस्थिती सावरण्यामागे लवकर लागू केलेले लाॅकडाऊन हे कारण महत्त्वाचे ठरते. लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्सचे वरिष्ठ संशाेधक थाॅमस जिपिआेंका म्हणाले, आॅस्ट्रियाने १६ मार्चला लाॅकडाऊन लागू केला हाेता. तेव्हा इतर देश केवळ विचार करत हाेते. ब्रिटनने २३ मार्चला याबाबत निर्णय घेतला हाेता. थाॅमस यांच्या मते आॅस्ट्रियाचा भाग इटलीच्या सीमेला जाेडलेला आहे. अशा प्रकारचे कठाेर निर्णय व निगराणीमुळे काेेराेना प्रादुर्भाव राेखता येऊ शकला. पाेलिसांची गस्त महत्त्वाची ठरली. बाहेर भटकणाऱ्या १७ हजार लाेकांंवर माेठा दंड लावण्यात आला. बहुतांश लाेकांना सेल्फ क्वारंटाीन ठेवण्यात आले. त्यामुळे काेराेनाचा काळ  कठीण ठरला नाही. 

लाेकांना रुग्णालयापासून दूर ठेवण्यात हाॅटलाइनची मदत 

लवकरच केलेले लाॅकडाऊन, आयसाेलेशन याशिवाय हाॅटलाईन व माेबाईल टेस्टिंग युनिटने देखील महामारी राेखण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. मुख्य आराेग्य सल्लागार क्लेमेंस मार्टिन म्हणाले, लक्षणे दिसताच माेबाईल टेस्टिंग युनिटने तपासणी केली जाते. हाॅटलाईनवर माेफत काॅलच्या साह्याने टेस्टची गरज आहे किंवा नाही, हे समजते. ही टीम बाधिताच्या घरी जाऊन टेस्ट व स्क्रिनिंग करते. नवीन लाेकांना रुग्णालयात जाण्यापासून राेखणे हे सर्वात माेठे आव्हान हाेते. त्यामुळे तेथे संसर्ग झपाट्याने वाढण्याची भीती हाेती. ते राेखण्यात आम्ही बऱ्यापैकी यश मिळवल्याचे मार्टिन यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...