आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुम्हाला १०० वर्षांपेक्षा अधिक वयाचे रहस्य माहीत आहे? वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, पौष्टिक आहार, व्यायाम आदी दीर्घायुष्याची गुरुकिल्ली असल्याचे आपण आतापर्यंत ऐकत होतो. मात्र, वयाची शंभरी पार करायची असेल तर कधी-कधी आजारी होणेही गरजेचे आहे, हे ताज्या संशोधनातून समोर आले आहे. वारंवार आजारी होणे चांगले नाही, असे आपण नेहमीच वडीलधाऱ्यांकडून ऐकत आलो आहोत. मात्र, या संशोधनाचे निष्कर्ष याच्या उलट आहेत. बोस्टन विद्यापीठ आणि टफ्ट्स मेडिकल सेंटरच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, संसर्गाचा सामना करण्याचा भरपूर अनुभव हेच १०० वर्षांपेक्षा अधिक आयुष्य जगण्याचे रहस्य आहे.
संशोधनाच्या लेखिका तथा टफ्ट्स विद्यापीठाच्या जैव सांख्यिकी तज्ज्ञ पाओला सेबेस्टियानी सांगतात, ‘वयाची शंभरी पार केलेल्या लोकांचे इम्यून प्रोफाइल संसर्गाच्या संपर्कात आल्याने व त्यातून बरे होण्याच्या क्षमतेचा एक दीर्घ इतिहास दाखवते.’ संशोधनादरम्यान अशा लोकांमध्ये एक अद्वितीय जनुक आढळले, पण दीर्घायुष्यात मजबूत प्रतिकारशक्तीही महत्त्वाचा घटक आहे, यावर शास्त्रज्ञांना विश्वास आहे. १०० वर्षांपेक्षा जास्त जगलेल्या सात लोकांच्या डीएनएचा अभ्यास केल्यानंतर सर्वांमध्ये एक गोष्ट समान होती. त्या सर्वांनी भरपूर बग आणि व्हायरसशी लढा दिला होता. यासाठी त्यांच्या शरीरात संसर्गाचा सामना करण्यासाठी आवश्यक बी सेल, इम्यून सेल व अँटिबॉडीज मोठ्या संख्येने आढळल्या.’ सेबेस्टियन म्हणतात, याच संरक्षणात्मक घटकांमुळे हे वृद्ध कोरोना व स्पॅनिश फ्लू आदी महामारीचा सामना करू शकले. संशोधनादरम्यान १००-११९ वर्षे वयोगटातील लोकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यात सहभागींच्या इम्यून सिस्टिममधील महत्त्वाचे भाग (पीबीएमसीएस) वेगळे केले होते.
टीमने १०० वर्षांवरील लोकांच्या इम्यून सेल्समध्ये नाट्यमय बदल पाहिला. सीडी ४+ टी सेल्सच्या तुलनेत बी पेशी अधिक आढळल्या. टफ्ट्स मेडिकल सेंटरच्या प्रमुख लेखिका तान्या कारागियानिस सांगतात, ‘१०० वर्षांवरील लोकांमध्ये संरक्षणात्मक कारक असतात. ते आजारांपासून बचाव करतात.’
१४० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकेल मानव : अहवाल
जॉर्जिया विद्यापीठाच्या ताज्या अहवालानुसार, माणसाचे जिवंत राहण्याचे वय सध्याच्या १२२ वर्षांचा विक्रम मोडत १४० च्या वर पोहोचेल. पुरुष १४१ वर्षांपर्यंत आणि महिला १३० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. अहवालानुसार, ९० च्या दशकाच्या तुलनेत सध्याच्या काळात ते जास्त आयुष्य जगत आहेत. यामुळे आगामी दशकांमध्ये मृत्यूचे वय नाट्यमयरीत्या वाढण्याची शक्यता आहे.
११४ वर्षांच्या आहेत मारिया ब्रन्यास मोरेरा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.