आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळे उद्ध्वस्त:गनीने अफगाणला विश्वासघाताने तालिबानच्या हातात सोपवले : अमेरिकेतील पहिल्या महिला राजदूत रोया रहेमानी

वॉशिंग्टन / रोहित शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी संकोचलेली. चिंतीत आणि घाबरून गेली आहे. विश्वासघात काय असतो हे अनुभवत आहे. त्यामुळे सगळे काही उद्ध्वस्त झाले. माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देशाचा विश्वासघात केला. त्यांनी अगदी हसत-खेळत अफगाणिस्तानला तालिबानच्या हाती सोपवले, असे रोया रहेमानी यांनी म्हटले आहे. रहेमानी अफगाणिस्तानातील महिला सशक्तीकरणाचा चेहरा आणि अमेरिकेतील पहिल्या महिला राजदूत आहेत. त्यांनी भास्करशी चर्चा केली. त्या म्हणाल्या, १९९८ मधील क्रूर तालिबानी राजवटीला पुन्हा अनुभवत आहे. तेव्हा मी पाकिस्तानात होते. १९९८ मध्ये कुटुंबासह काबूलला परतले होते. तेव्हा काबूल काळोखात आणि दहशतीखाली जगत होते. महिलांना बाहेर देखील जाता येत नव्हते. ते सगळे पाहिले असल्याने घाबरून गेले आहे. यावेळी तालिबानने १९९६ सारखा अत्याचार केला नाही. तूर्त तरी बरेच काही बघावे लागेल. लाखो लोकांनी त्यातही महिलांनी अफगाणिस्तानला घडवण्यासाठी खूप कष्ट केले आहेत. लाखो लोकांनी बलिदान दिले. परंतु पापणी लवताच सर्वकाही संपले.

आता या राजवटीत महिलांना काही अधिकार नाहीत. आज असंख्य कुटुंबे अडकली आहेत. देशाच्या नेतृत्वावर रहेमानी म्हणाल्या, काबूलने अमेरिकेच्या सरकारची देखील दिशाभूल केली. देश तालिबानच्या ताब्यात जाणे हे सुरक्षा दलाच्या अपयशाचे कारण नव्हते. ते लढण्यासाठी तयार होते. त्यांनी देशाशी विश्वासघात केला नाही. परंंंतु शरणागती घ्यावी असे अशरफ गनी यांनी सांगितले. पहिल्यांदा युद्ध जिंकणार असल्याचे सांगितले होते. परंतु लष्कराला सीमेवर विना दारूगोळा पाठवण्यात आले होते.

तालिबानने बादरी-३१३ नावाने आपले विशेष सैन्य दल स्थापन केले आहे. अत्याधुनिक अमेरिकन शस्त्रे, बुलेटप्रूफ जॅकेट, नाइट व्हिजन गॉगल्ससह अनेक सुविधा हे सैनिक वापरताना दिसून आले. हे दल सलवार कमीजमध्ये नसून आधुनिक पोषाखात दिसते. त्यांच्याकडे एके-४७ पासून अत्यंत घातक बंदुकाही आहेत. तालिबानचे हे सैन्य काबूलच्या मार्गांवर सातत्याने गस्त घालताना दिसते. तालिबान अशा दलासाठी आपल्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे.

तालिबानचा चेहरा : महिला अँकर, परदेशी कार्यक्रमांवर बंदी
- अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गुरुवारी म्हणाले, अमेरिकेचे मित्रराष्ट्र अफगाणिस्तानला ३१ ऑगस्टपर्यंत सोडू शकले नाही तर अमेरिकी सैन्य अफगाणला पूर्ण सोडण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्टपासून वाढवली जाऊ शकते. देशात अजूनही १० ते १५ हजार अमेरिकन सैन्य आहे. त्याचबरोबर ५० हजार ते ६० हजार अफगाणी व त्यांचे कुटुंबीय आहेत.
- असदाबादमध्ये ध्वज फडकवणाऱ्या निदर्शकांवर तालिबानने गोळीबार केला. त्यात अनेकांचा मृत्यू झाला.
- अफगाणिस्तानच्या तुरुंगातील राजकीय कैद्यांच्या सुटकेचे तालिबानचे आदेश आहेत.
{तालिबानच्या हाती अमेरिकी सैन्याचे बायोमेट्रिक डिव्हाइसही लागले आहेत. त्यात अमेरिकी सैन्य व युद्धादरम्यान साथ देणाऱ्या अफगाणींचा डेटा आहे. आता तालिबानी या लोकांची ओेळख पटवून त्यांना यातना देऊ शकतात.
- तालिबानने महिला अँकरना काम करण्यास मनाई केली आहे. टीव्हीवर परदेशी कार्यक्रम प्रसारणासही बंदी घातली. सरकारी वाहिन्यांवरून इस्लामिक संदेश दिला जात आहे.
- बदगीस प्रांतात पोलिस प्रमुख हाजी मुल्ला यास जाहीरपणे गोळ्या घालण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी मुल्लाने शरणागती पत्करली होती.
- अफगाणिस्तानातील एटीएममधील रोकड संपली आहे.
- आयातीवर अवलंबून देशातील ३.८० कोटी लोकांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे.
- तालिबानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगाणिस्तानातील संसाधनांच्या वापरावर बंदी घातली.

बातम्या आणखी आहेत...