आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Gilgit Baltistan Granted Temporary Status To Pakistan; Pakistan's Decision Illegal India's Strong Reaction

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इम्रान सरकारचा निर्णय:गिलगिट-बाल्टिस्तानला पाकने दिला अस्थायी प्रांतांचा दर्जा; पाकचा निर्णय बेकायदा - भारताची तीव्र प्रतिक्रिया

इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही दिवसांपूर्वी सौदी अरबने गिलगिट आणि बाल्टिस्तान हे प्रांत पाकिस्तानच्या नकाशातून काढून टाकले होते

गिलगिट आणि बाल्टिस्तान हे प्रांत सौदी अरबने पाकिस्तानच्या नकाशातून काढून टाकल्यानंतर भांबावलेल्या इम्रान खान सरकारने तातडीने पावले उचलत या दोन्ही भागास अस्थायी प्रांतांचा दर्जा देऊ केला आहे. गिलगिट आणि बाल्टिस्तानात इम्रान सरकारविरुद्ध प्रचंड रोष पेटलेला असताना इम्रान सरकारने हा निर्णय घेतला आहे. भारतानेही या निर्णयास विरोध दर्शवला असून पाकिस्तानने या दोन्ही प्रांतांतून काढता पाय घ्यावा, अस आवाहन केले आहे. जिओ न्यूजनुसार, या भागात एका समारंभात स्वत: पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली. दरम्यान, या घोषणेनंतर या दोन्ही प्रांतांत उग्र निदर्शने केली जाण्याची शक्यता असून यापूर्वी व्याप्त काश्मीरमध्ये ८ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट आणि स्टुडंट्स लिबरेशन फ्रंट या संघटनांनी गिलगिट-बाल्टिस्तानच्या संभाव्य विलीनीकरणास विरोध केला होता. पाकिस्तानात या प्रांतांना मर्यादित स्वातंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे.