आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब!:138 वर्षानंतर कुटुंबात झाला मुलीचा जन्म; 6 पिढ्यांपासून लेकीची प्रतीक्षा, स्वागतासाठी दिली जंगी पार्टी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या मिशीगन प्रांतातील एका कुटुंबात तब्बल 138 वर्षांनंतर मुलीचा जन्म झाला आहे. सव्वाशे वर्षांहून जास्त प्रतीक्षेनंतर घरी आलेल्या लक्ष्मीच्या पावलांनी या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सहा पिढ्यांनंतर घरात मुलीचा जन्म झाल्याची ही कहाणी आता जगभरात चांगलीच चर्चिली जात आहे.

1885 पासून कुटुंबात मुलगी जन्मलीच नाही

अमेरिकेच्या मिशीगन प्रांतात राहणाऱ्या अँड्र्यू यांच्या कुटुंबाची ही कहाणी आहे. या कुटुंबात 1885 मध्ये मुलीचा जन्म झाला होता. त्यानंतरच्या 6 पिढ्यांत या कुटुंबात मुलीचा जन्मच झाला नाही. सुरूवातीच्या काही वर्षांत या कुटुंबाला याचे काही वाटले नाही. मात्र अनेक दशकांनंतरही कुटुंबातील कोणत्याच सदस्याच्या घरी मुलीचा जन्म होत नसल्याने या कुटुंबाच्या चिंता वाढत गेल्या.

मुलीच्या स्वागतासाठी दिली जंगी पार्टी

अखेर मुलीच्या आगमनाची ही प्रतीक्षा वाढत वाढत काही दशके आणि शतकांपर्यंत गेली. मात्र या कुटुंबात मुलीचा जन्म झाला नाही. अखेर या कुटुंबाने मुलीची आशा सोडून दिली होती. मात्र अलिकडेच अँड्र्यू यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि या कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तब्बल 138 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घरी आलेल्या लक्ष्मीच्या पावलांनी संपूर्ण कुटुंब अतिशय आनंदी झाले. या आनंदात त्यांनी जंगी पार्टी दिली. यात कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी झाले. या कुटुंबाच्या अनोख्या कहाणीची आता जगात चांगलीच चर्चा होत आहे.